कांकरिया ॲटो मोबाईल प्रा. लि. नागापुर यांचे चोरीस गेलेले २४०००/- रु किंमतीचे ५९ लिटर इंजिन ऑईल आरोपीचे ताब्यातुन जप्त एमआयडीसी पोलीस स्टेशनची कामगिरी

अहमदनगर दि.६ जुलै (प्रतिनिधी)
एमआयडीसी पोलीस स्टेशन गुरनं । ५९९/२०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे दिनांक ०५.०७.२०२३ रोजी २२.४२ वा फिर्यादी नामे प्रदिप अणाजी सोनवणे रा भिस्तबाग चौक सावेडी अहमदनगर यांचे फिर्यादीवरून कांकरिया ऑटोमोबाईल प्रा.लि. सहयाद्री चौक नवनागापुर अहमदनगर यां कंपनीचे वर्कशॉप मधुन वेळोवेळी २४,०००/- हजार रू किंमतीचे कांकरिया कंपनीचे नवीन सव्हिसिंग ऑईल ची चोरी झाले बाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहेकॉ / ६०६ साईनाथ गंगाधर टेमकर हे करत असतांना सदर वर्कशॉप मध्ये
हाऊस किपिंगचे काम करणारे इसमांना विश्वासात घेवून सखोल चौकशी केली असता आरोपी नामे फुरकन मोहमंद अली वय १९ रा जामुनामुख जि नागाव राज्य, आसाम हल्ली रा. गजानन कॉलनी नागापुर अहमदनगर
यांने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. व गुन्हयातील चोरीस गेला माल २४०००/- रू किंमतीचे ५९ लीटरइंजिन ऑईल हे आरोपीने त्यांचे राहते घरातुन काढुन दिले असुन ते गुन्हयाचे तपासकामी जप्त करण्यात आले आहे.
सदरची कौतुकास्पद कामगिरी श्री. राकेश ओला . पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे . अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर श्री. संपत भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग अहमदनगर पोनि दिनेश आहेर सो. स्थानिकगुन्हे शाखा अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि श्री. राजेंद्र सानप. पोसई दिपक पाठक , पोहेकॉ / ६०६ साईनाथ टेमकर, पोकॉ/ २३८४ सुरेश सानप, पोकॉ/१६९ उमेश शेरकर यांचे पथकाने केलेली आहे.