नगर शहर ब्लॉक युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी प्रविण गिते, विद्यार्थी काँग्रेसच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी ओंकार नऱ्हे यांची निवड

अहमदनगर (प्रतिनिधि ): नगर शहर ब्लॉक युवक काँग्रेसच्या ब्लॉक अध्यक्षपदी प्रवीणभैय्या गीते पाटील यांची व अहमदनगर शहर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी ओमकार नऱ्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा व विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष वीरेंद्र ठोंबरे यांनी नियुक्ती या नियुक्त्या जाहीर केल्या असून गिते व नऱ्हे यांना शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र पत्र प्रदान करण्यात आले आहेत.
प्रवीण गीते हे मागील एक वर्षापासून काँग्रेसच्या क्रीडा विभागाचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. अल्पावधीमध्ये त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असून त्यांचा युवकांमध्ये दांडगा संपर्क आहे. काँग्रेसने गीते यांना आता युवक काँग्रेस ब्लॉक अध्यक्षपदाची धुरा सोपवून त्यांची जबाबदारी वाढविली आहे.
ओंकार नऱ्हे हे बोल्हेगाव परिसरातील आहेत. मागील दोन वर्षांपासून ते विद्यार्थी चळवळीमध्ये काम करत आहेत. विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांवर आजवर त्यांनी आवाज उठविला आहे. नऱ्हे यांचा विद्यार्थी वर्गामध्ये मोठा संपर्क आहे. नऱ्हे यांना संधी देत काँग्रेस पक्षाने विद्यार्थ्यांचे संघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने पावले टाकली आहेत.
*महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी शहर जिल्हाध्यक्ष पदाची धुरा किरण काळे यांच्या खांद्यावर सोपविल्या पासून शहरातील काँग्रेसला गतवैभव प्राप्त झाले आहे. काळे यांच्या सक्षम नेतृत्वामुळे अनेक चांगल्या चेहऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. अजून अनेक चेहरे पक्षाच्या संपर्कात असून काळे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच त्यांचा पक्षप्रवेश ना.बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांच्या उपस्थितीत मुंबईत होणार असल्याची माहिती मनोज गुंदेचा यांनी दिली आहे.*
काळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे संघटन मजबूत होत असून युवक व विद्यार्थी पक्षाकडे आकर्षित होत आहेत. या दोन्ही विभागाचे संघटन मजबूत करत त्यांना ताकद दिली जाणार असल्याचे गुंदेचा यांनी म्हटले आहे. गीते व नऱ्हे यांचे नियुक्तीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.