कौतुकास्पद
मिरजगाव येथील सामजिक कार्यकर्त्या सौ.सरस्वती भगवानबाबा घोडके पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित!

मिरजगाव दि.३१ मे (प्रतिनिधी)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या. जयंतीनिमित्त कर्जत तालुक्यातील मिरजगाव ग्रामपंचायत मध्ये झालेल्या कार्यक्रमा वेळी. महिला व बालकल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांचे आदेशाने. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. त्यात मिरजगाव मधील सामाजिक कार्यकर्त्या सौ. सरस्वती भगवान बाबा घोडके यांचा सन्मान सरपंच सौ.सुनिता नितीन खेतमाळस, डॉ.पंढरीनाथ आबा गोरे, ग्रामविकास अधिकारी आटोळे साहेब, सौ. कांताबाई मंगेश घोडके, सौ.रेखा दीपक कोरडे, सौ.उषा अशोक कोरडे, यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.