गुन्हेगारी

गॅस गोडाऊनच्या घरफोडी गुन्हयात 9 आरोपीची टोळी निष्पन्न! धाराशीव येथून 1 आरोपी 5,20,000/- रू किंमतीचे 130 गॅस टाक्यासह ताब्यात! एलसीबी ची कारवाई

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर: प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दि.10/06/2025 रोजी फिर्यादी सुनिल अंकुशराव बेळगे, वय 34, रा.पाथर्डी, ता.पाथर्डी यांचे चिंचपूर इजदे येथील भारत गॅस कंपनीचे मोहटादेवी गॅस गोडाऊनचे अज्ञात आरोपीतांनी कुलूप तोडून भारत गॅस कंपनीच्या भरलेल्या गॅस टाक्या चोरून नेल्या.याबाबत पाथर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं.640/2025 बीएनएस कलम 305 (अ), 331 (4) प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल आहे.
मा.पोलीस अधिक्षक,अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्हयातील उघडकीस न आलेल्या घरफोडी गुन्हयांचा तपास करून गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेश दिले आहेत.त्यानुषंगाने पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, सुरेश माळी, मनोहर गोसावी, गणेश भिंगारदे, ज्ञानेश्वर शिंदे, गणेश लोंढे, संतोष लोढे, गणेश धोत्रे, अरूण गांगुर्डे, फुरकान शेख, हृदय घोडके, सोमनाथ झांबरे, विजय ठोंबरे, किशोर शिरसाठ, बाळसाहेब गुंजाळ, रोहित येमुल, रमिझराजा आत्तार, सुनिल मालणकर, भगवान थोरात, आकाश काळे, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, जालींदर माने, बाळसाहेब खेडकर, प्रशांत राठोड, सागर ससाणे, भाग्यश्री भिटे, सारीका दरेकर, महादेव भांड, चंद्रकांत कुसळकर, भगवान धुळे व अरूण मोरे अशांचे पथक नेमुण घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.
दिनांक 19/06/2025 रोजी पथक पाथर्डी पोलीस स्टेशन गुरनं 640/2025 प्रमाणे दाखल गुन्हयाचा तपास करत असताना गोपनीय व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी राजेंद्र गुलाब काळे, रा.कासारखानी, ता.वाशी, जि.धाराशीव याने त्याचे साथीदारासह केला असून ते वाशी, ता.वाशी, जि.धाराशीव गावचे परिसरात असल्याची माहिती प्राप्त झाली.पथकाने मिळालेल्या माहितीतील ठिकाणी जाऊन संशयीत आरोपीचा शोध घेत असताना, आरोपीस पोलीस पथकाची चाहुल लागताच तो पळून जाऊ लागला.पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करून 1) राजेंद्र गुलाब काळे, वय 42, रा.कासार खानी, ता.वाशी, जि.धाराशीव यास ताब्यात घेतले.पथकाने ताब्यातील आरोपीकडे गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने त्याचे साथीदार 2) सुंदर शंकर शिंदे, रा.दसमेगाव, ता.वाशी, जि.धाराशीव (फरार) 3) रामा सुबराव काळे (फरार) 4) गुलाब गुंपूर काळे (फरार) 5) सुनिल लगमण पवार (फरार) 6) दत्ता लगमण पवार ( फरार) 7) लगमण भिसराम पवार (फरार) 8) शंकर सुरेश काळे (फरार) अ.क्र.3 ते 8 रा.लक्ष्मीपेढी, तेरखेडा, ता.वाशी, जि.धाराशीव 9) माणीक गुलाब काळे, रा.कासार खानी, ता.वाशी, जि.धाराशीव (फरार) अशांनी मिळून सुनिल लगमण पवार याचे स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एमएच-14-सीव्ही-1212 व रामा सुबराव काळे याचे सहाचाकी ट्रक क्रमांक माहित नाही अशी वाहने घेऊन मागील दहा दिवसापुर्वी पाथर्डी तालुक्यातील एक गॅस गोडावूनचे कुलूप तोडून गॅस टाक्या चोरल्याची माहिती सांगीतली.
पथकाने गुन्हयात चोरलेल्या गॅस टाक्याबाबत आरोपीस विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने चोरलेल्या गॅस टाक्या या राहुल हनुमंत चेडे, रा.शिवाजीनगर, वाशी, ता.वाशी, जि.धाराशीव याचेकडे ट्रक खराब झाल्याने त्याचे हॉटेलमध्ये ठेवल्याची माहिती सांगीतली.पथकाने राहुल हनुमंत चेडे, वय 38, रा.शिवाजीनगर, वाशी, ता.वाशी, जि.धाराशीव यास गॅस टाक्या हजर करणेबाबत कळविले.पथकाने पंचासमक्ष राहुल हनुमंत चेडे याने हजर केलेल्या 5,20,000/- रू किंमतीच्या 130 भारत गॅस कंपनीच्या टाक्या तपासकामी जप्त करण्यात आल्या आहेत.
ताब्यात घेण्यात आलेल्या जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह पाथर्डी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्हयाचा पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदर कारवाई मा.श्री.सोमनाथ घार्गे,पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा.श्री.प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, व मा.श्री.सुनिल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे