निधन
फुले,शाहू,आंबेडकरी विचारांचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कैलास उर्फ बाळासाहेब तबाजी रोकडे यांचे निधन

फ
अहमदनगर दि. ११ऑगस्ट (प्रतिनिधी ) फुले,शाहू,आंबेडकरी विचारांचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कैलास उर्फ बाळासाहेब तबाजी रोकडे यांचे निधन झाले असल्याची बातमी समोर आली आहे. मृत्युसमयी त्यांचे
(वय: ७०) होते. अल्पशा आजाराने केडगाव येथे दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सूना, नातवंडे त्याच प्रमाणे मोठा मित्र परिवार आहे. त्यांच्या जाण्याने आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांमध्ये अहमदनगर जिल्ह्यातून तसेच शहरातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचा अंत्यविधी रविवार दिनांक १३ रोजी नालेगाव येथील अमरधाम येथे दुपारी १२ वाजता होणार आहे.