राजकिय

शिवसंग्राम पक्षाच्या वतीने आर पी आयच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान

अहमदनगर दि:१६ (प्रतिनिधी) – मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शिवसंग्राम पक्षाच्या वतीने अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन केले होते. त्यावेळी आर पी आय (आठवले) पक्षाच्या वतीने सक्रिय सहभागी होऊन आंदोलनाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे शिवसंग्राम पक्षाच्या सावेडी येथील बैठकीदरम्यान आर पी आय (आठवले) युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, युवक जिल्हा उपाध्यक्ष आकाश बडेकर, युवक जिल्हा सरचिटनिस दया गजभिये, युवक तालुका सरचिटनिस निखिल सुर्यवंशी यांचा सत्कार शिवसंग्राम पक्षाचे जिल्हा निरीक्षक शेखर पवार , जिल्हाध्यक्ष सुरेश शेटे पाटील, जिल्हा सरचिटनिस डी जी सोनवणे यांच्या वतीने करण्यात आला.
नगर तालुक्यातील दरेवाडी येथील डी जी सोनवणे यांची शिवसंग्राम पक्षाच्या जिल्हा सरचिटनिसपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार आर पी आय (आठवले) पक्षाच्या वतीने करण्यात आला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे