सुगी फौंडेशनच्या वतीने सावित्रीमाई फुले जयंती उत्साहात साजरी

राहुरी दि.४ जानेवारी (प्रतिनिधी)
राहुरी शहरात सुगी फौडेंशनच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली यावेळी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस वर्षाताई बाचकर व बेबीताई शिंदे यांनी सावित्रीबाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून सहभागी महिलांनी सावित्रीमाईंना पुष्पगुच्छ अर्पण करून अभिवादन केले. यावेळी वर्षाताई बाचकर यांनी सावित्रीमाई फुले यांचा ऐतिहासिक कार्यकाल यावर मनोगत व्यक्त करताना सांगितले की भारत देशामध्ये सावित्रीमाई फुले यांनी मुलींना शिक्षण मिळावं म्हणून स्वतः क्रांतीबा ज्योतिबा फुले यांच्याकडून शिक्षण घेऊन मुलींसाठी शाळा काढली. शिक्षण क्षेत्रात नवीन पर्व भारत देशात सुरू झाले. आज वर्तमानकाळात स्त्रिया देखील सर्व पदांवरती सर्वच क्षेत्रात अग्रेसर भूमिका घेऊन काम करत आहेत. म्हणून आजही सावित्रीमाई फुले यांचा विचार वारसा नवीन पिढीला देत राहणे आपल्या सर्वांचे काम आहे असे आपल्या मनोगतात मत व्यक्त केले. कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांचे बेबीताई शिंदे यांनी आभार व्यक्त केले.यावेळी कार्यक्रमासाठी आयशा शेख,, अंजुम शेख, काजल जगंम, बेगम शेख, मधुबाला भिगांरदिवे, आदि महीलानीं सहभाग घेतला होता.