पारनेर – दैनिक देशस्तंभ, (तालुका प्रतिनिधी देवदत्त साळवे)
फसवणूक केल्याप्रकरणी कान्हूर पठार येथे मुख्यालय असलेल्या राजे शिवाजी पतसंस्थेचे चेअरमन व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आझाद ठुबे यांना पारनेर पोलिसांनी रविवारी रात्री अटक करून सोमवारी पारनेरच्या न्यायालयापुढे हजर केले असता त्यांना न्यायालयाने २५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
सविस्तर वृत्त असे की, सहकार अधिकारी तात्यासाहेब भोसले यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार आझाद ठुबे यांच्यासह रणजित पाचारणे,पोपट म्हस्के व मॅनेजर संभाजी भालेकर यांच्या विरोधात पारनेर पोलीस ठाण्यात संगनमताने अवैध सावकारी करून कर्जदारांनी कर्ज प्रकरणात सादर केलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आझाद ठुबे व इतर आरोपी पसार झाल्यामुळे पोलिस त्यांच्या मागावरच होते.
रविवारी आझाद ठुबे कान्हूर पठार येथे घरी असल्याचे समजल्यावर पोलिस निरीक्षक समिर बारवकर यांनी पोलिस पथकासह रात्री साडेअकरा वाजता त्यांच्या राहत्या घरी छापा टाकून त्याला अटक करण्यात आली.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा