सामाजिक
जिल्हा परिषद इंजिनिअर व ग्रामसेवक, ठेकेदार यांचा खारे कर्जूने गावात अजब कारभार

- अहमदनगर दि.4 ऑक्टोबर (प्रतिनिधी )
अहमदनगर जिल्ह्यातील खारेकर्जुने गावातील जिल्ह्यापरिषद अंतर्गत रस्त्ता कामात इंजिनिअर आंबेडकर व ग्रामपंचायत ठेकेदार यांनी अजब प्रकार केला आहे अहमदनगर जिल्ह्यातील खारे कर्जुने मधे इंजिनिअर यांनी लाइन आउट न करता ठेकेदार यांनी परस्पर रस्त्याचे काम सुरु केले. काल 2 / 10 /2023 रोजी गांधी जयंती असतानाच सदर इंजिनीयर आंबेडकर हे नाशिक येथे असतानाच व कॉलेटी इंजिनिअर कामाच्या ठीकाणी नसतांना देखील जिल्हापरिषद अंतर्गत ठेकेदार यांनी कुठल्याच अधिकारी यांना सूचना न देता रस्त्याचे कामकाज सुरु केले जेव्हा सदर रस्ता जेव्हा खाजगीत शेत जमीन मध्ये होत असताना जागेचे मालक संजूभाऊ बोरुडे यांनी जेव्हा इंजिनिअर आंबेडकर यांना कामाची सुचना दिली की साहेब आपण जो रस्ता करत आहेत. तो खाजगी जागेत आहे. व त्या जागेचा कोर्टात दावा दाखल आहे. पंरतु आपण कुठलेच कागदपत्र न पाहता रस्ता कसा सुरु केला. तेव्हाच इंजिनिअर आंबेडकर यांनी फोन वरून संजूभाऊ बोरुडे यांना सांगितले की मी काम करण्यास परवानगी दिली नाही. किंवा लाइन आउट पण दिला नाही. मी नाशिकला कामानिमित्त आहे.ठेकेदार परस्पर काम करत आहेत. तुम्ही काम बंद करा तेव्हा संजूभाऊ बोरुडे हे म्हणाले की साहेब तुम्हीच फोन करून काम बंद करा व ठेकेदार यांना जाब विचारा की तुम्ही मी लाइन आउट न करता काम काज कसे सुरु केले. तेव्हा इंजिनिअर आंबेडकर म्हणाले मी त्या कामाचे बील पास करणार नाही. तेव्हा संजूभाऊ म्हणाले बीलाचे नंतर पहा. पहिला माझ्या वडिलोपार्जित शेत जमीन गट क्रमांक 33 मधुन आतीक्रमण रस्त्ता थांबवा परंतु इंजिनिअर आंबेडकर यांनी ठेकेदार यांना कुठल्याच सूचना दिल्या नाहीत.परंतु जेव्हा संजूभाऊ बोरुडे यांनी 3 /10 /2023 रोजी सदर कामावर जात बोगस काम बंद केले. तेव्हा मात्र जिल्हा परिषद इंजिनिअर आंबेडकर तेथे आले तेंव्हा संजूभाऊ बोरुडे यांनी इंजिनिअर आंबेडकर यांना विचारणा केली की साहेब काल आपण नाशिक येथे होता. मग ठेकेदार यांनी आपणास सूचना देऊन कामकाज सुरु केले होते का तेव्हाच इंजीनिअर यांनी पस्ट सांगीतले की मी कुठलेच काम करण्यास सांगीतले नाहीत व मी ले आउट पण कुला नाहीत ठेकेदार यांनी परस्पर काम करण्यास सुरुवात केली आहे तेव्हा संजूभाऊ बोरुडे यांना प्रश्न केला की आपल्या परस्पर काम सुरू करण्यात आले. म्हणून ठेकेदार व ग्रामपंचायत ग्रामसेवक यांच्यावर कायदेशीर कारवाई करा.तेव्हा इंजिनिअर आंबेडकर हे संजूभाऊ बोरूडे याच्यावर चिडत तु मला सांगू नकोस मला काय करायचं आहे ते, तेव्हा संजूभाऊ बोरूडे यांनी आंबेडकर यांना सांगीतले की साहेब माझ्याच शेत जमीनीवर रस्ता करत आहेत. व मलाच दम देखील देत आहेत. साहेब तुम्ही कुठल्याच बाबतीत कागद पत्र इस्टीमेट न पाहता ठेकेदार परस्पर काम करत असतांना ठेकेदार यांना कामाचा जाब नविचारता मला दम बाजी करत आहेत का तेव्हाच इंजीनिअर व संबंधित ठेकेदार गाडीवर बसून निघून गेले संबंधित जागेवर कोर्टात दावा सुरु आहे. व खाजगी जागेत कुठेच सरकारी कामकाज करता येत नसतांना देखील खारे कर्जुने ग्रामसेवक ठेकेदार सदस्य जिल्ह्यापरिषद इंजीनिअर यांनी संगत मत करुन निकृष्ट दर्जाचे काम केले आहे. संजूभाऊ बोरुडे यांनी फेसबुकवर लाईव्ह च्या माध्यमातून जनते समोर सर्व प्रकार उघड केला आहे. सर्व बाबींचा विचार करून जिल्हा परिषद सदर इंजीनिअर व ठेकेदार याच्यावर काय कारवाई करणार आहेत. हे लवकरच पाहण्या सारखे आहे.