गुन्हेगारी

2250 किलो गोवंशीय जातीच्या जनावरांचे कत्तल केलेले मांस व साहित्यासह एकूण 4,50,100 रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त, श्रीरामपूर शहर पोलीसांची कारवाई!

अहमदनगर दि. 23 जून (प्रतिनिधी )
दिनांक 22/06/2024 रोजी दुपारी 1.30 वा. सुमारास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख सोो. यांना गुप्तबातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, हारुन अब्दुलनबी कुरेशी, रा. मिलत्तनगर वार्ड नं.01, श्रीरामपूर येथे याच्या मालकीच्या घराच्या कंपाउंडमध्ये काही इसम गोवंशिय जनावरांची कत्तल करत आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख साो. यांनी पोलीस पथकास नमुद ठिकाणी जावुन कारवाई करण्याचे आदेश दिल्याने, पोलीस पथक हे पंच व पशु वैदयकीय अधिकारी यांच्यासह 14/00 वा. सदर ठिकाणी छापा टाकाला असता सदर ठिकाणी काही इंसम हे गोवंशीय जनावराच्या मांसाचे तुकडे करतांना मिळुन आले. सदर इसमाना जागीच पकडुन त्यांना त्यांची नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव व पत्ता खालील प्रमाणे सांगितले.
1) शहबाज आयाज कुरेशी, वय 23 वर्षे, (अटक) 2) अरबाज आयाज कुरेशी, वय 26 वर्षे, (अटक) 3) फयाज आयास कुरेशी, वय 21 वर्षे, (अटक) 4) अदनान मेहबुब कुरेशी, वय 19 वर्षे, (नोटीस) 5) रोहबाज मेहमुद कुरेशी, वय 18 वर्षे, (नोटीस) 6) आरबाज मेहमुद कुरेशी, वय 21 वर्षे (नोटीस) 7) शाहिद मुश्ताक कुरेशी, वय 21 वर्षे, (नोटीस), वरील सर्व रा. कुरेशी मोहल्ला वार्ड नं.02 श्रीरामपूर 8) हारुण अब्दुलनबी कुरेशी रा. मिलत्तनगर वार्ड नं.01, श्रीरामपूर (फरार) असे मिळुन आल्याने त्यांना तात्काळ ताब्यात घेवुन त्यांच्या ताब्यातुन खालील वर्णनाचे कत्तल केलेले गॉमास व इतर साहित्य जप्त करण्यात आले ते.
1) 4,50,000/- रु. किं.चे कत्तल केलेल्या जनावरांचे मांस वजन अंदाजे 2250 किलो, 200 रु किलो प्रमाणे किंअं.
2) 100/- रु. किं. चा एक लाकडी मुठ व धार असलेला सुरा जुवाकिंअ.
3) 00.00/- रु. किं. चा एक लाकडी ठोकळा मटन तोडण्याकरीता वापरण्यात येणारा जुवाकिंअ.
4,50,100/- एकण,
येणे प्रमाणे वरील वर्णनाचा व किंमतीचा मुद्देमाल ताब्यात बाळगतांना मिळुन आल्याने त्यांचे विरुध्द श्रीरामपूर शहर पो.स्टे. गुन्हा रजि. क्र. 647/2024 महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम 1995 चे सुधारित कायदा सन 2015 चे कलम 5, 5 (अ) (ब), 9 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबर्मे साहेब तसेच मा.उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर, डॉ. बसवराज शिवपुजे यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, नितीन देशमुख, यांचेकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोहेको/ शफिक शेख, पोना/ रघुवीर कारखेले, पोना/ शरद अहिरे, पोकों/ राहुल नरवडे, पोकी/गौतम लगड, पोकी/ रमिझराजा अत्तार, पोकों/संभाजी खरात, पोकों/ अजित पटारे, पोकों/ सुशिल होलगीर, पोका / धंनजय वाघमारे, पोको/ अमोल गायकवाड, पोकों/ रामेश्वर तारडे यांनी केली असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख साो, यांचे मार्गदर्शनाखाली पोहेको/ शफिक शेख हे करीत आहेत.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे