केडगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

केडगाव दि.१५ (प्रतिनिधी )
शिक्षणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१ वी जयंती आहे. दरवर्षी १४ एप्रिल हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात. अनेक अनुयायी विविध मार्गाने आपल्या डॉ. आंबेडकरांना मानवंदना देत असतात. कोरोनानंतर पहिल्यांदा मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली आहे.
केडगाव जागरूक नागरिक मंचातर्फे केडगाव आंबेडकर स्मारक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्ताने पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी मंचाचे अध्यक्ष विशाल पाचारणे तसेच मंचाचे पदाधिकारी प्रवीण पाटसकर , डॉ . सुभाष बागले , मनीषा लहारे , उस्मानगणी मन्यार , जालिंदर शिंदे , सुहास साळवे , सद्दाम शेख , प्रदीप सकट , सुनील कांबळे , किरण पाचारणे , ओमकार नवरखेले , मंदार सटाणकर , किशोर पाटील , सुनिल नांगरे , आदी उपस्थित होते.
‘महापुरुष हे कोणत्याही जातीपातीचे नसून समस्त विश्वाचे व अखिल मानवतेचे प्रतिक असतात ‘ असा संदेश मंचाचे अध्यक्ष विशाल पाचारणे यांनी दिला .
‘प्रज्ञा , शील , करुणा हे सर्वांनी आपल्या जीवनात अवलंबिलेच पाहिजे ‘ असे कथन डॉ. सुभाष बागले यांनी यावेळी केले. तसेच उस्मानगणी मन्यार यांनी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या .
केडगाव जागरुक नागरिक मंच सर्व थोर पुरुषांच्या जयंती – पुण्यतिथी साजरे करून त्यांचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतात .