राजकिय

50 खोके, एकदम ओके, खेळत बसा तुम्ही एक्के! रामदास आठवलेंचा कवितेतून विरोधकांना टोला!

मुंबई : आपल्या खुमासदार शैलीसाठी व मिस्किल चारोळ्या करत केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री व आरपीआय चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले नेहमीच चर्चेत असतात. रिपाई मेळाव्यात आठवले यांनी कवितेतून विरोधकांना चांगलाच टोला लगावला आहे.
विरोधक रोज आमचं सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र काहीही झालं तरी आमचं सरकार पडणार नाही. शिवसेनेनं आपली बाजू बदलली. सुरुवातील शिवसेना भाजप आणि आरपीआयबरोबर होती. मात्र त्यांनी महाविकास आघाडीचा रस्ता स्वीकारला आणि आमच्यापासून दूर गेली. मात्र आता शिंदे गट आणि भाजप एकत्र आलं आहे.
त्यामुळे विरोधक आमचं सरकार पाडण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी ते प्रयत्न देखील करत आहेत. मात्र सरकार पडणार नाही आहे. उलट आम्ही एकत्र येणार आहोत. सत्तेत वाटा मिळण्यसाठी प्रयत्न करत आहोत. यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत, असं रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं आहे. बालगंधर्व रंगमंदिरात रिपाइंचा मेळाव्याच्या वेळी ते बोलत होते.
यावेळी त्यांनी विरोधक करत असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या आंदोलनावर भाष्य केलं. नेहमीप्रमाणे कविता सादर करत त्यांनी विरोधकांना खडसावलं. ते म्हणतायत 50 खोके, एकदम ओके, खेळत बसा तुम्ही एक्के, आम्ही आहोत पक्के, अशा कवितेच्या चारओळी आठवले यांनी ऐकवल्या.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे