प्रशासकिय
पोलीस दलामध्ये महिला पोलीस कर्मचारी यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे: सपोनि देशमुख
भिंगार कॅम्प मध्ये महिला दिन साजरा,

अहमदनगर दि
८ मार्च (प्रतिनिधी)-पोलीस दलामध्ये महिला पोलीस कर्मचारी यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. असे प्रतिपादन भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक .शिशीरकुमार देशमुख यांनी केले. ८ मार्च महिला दिनाचे औचित्य साधून नुकताच दक्षता समीतीच्या महिला व भिंगार कॅम्प पोस्टेच्या महिला कर्मचारी यांचा पेन व फुल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.यावेळी दक्षता समितीच्या गौतमी भिंगारदिवे,सुनीता धनवटे, पठान मॅडम यांच्यासह महिला पोलीस कर्मचारी उपस्थित होत्या.यावेळी बोलतांना देशमुख म्हणाले की पोलीस दलामध्ये महिला पोलीस कर्मचारी यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. महिला दिन असुन सर्व महिला कर्मचारी आपले कर्तव्य बजावताना दिसत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.