सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेसाठी शाळा महाविद्यालयांना प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेसाठी शाळा महाविद्यालयांना
प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
अहमदनगर दि.06 (प्रतिनिधी) :- एकसष्टावी सुब्रोतो मुखर्जी आंतरराष्ट्रीय फुटबॉल कप सब ज्युनियर व ज्युनियर स्पर्धा 2022-23 साठी जिल्हयातील जास्तीत जास्त शाळा, महाविद्यालयांनी प्रवेशिका पाठवाव्यात असे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी श्रीमती भाग्यश्री बिले यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रिडा अधिकारी अहमदनगर व अहमदनगर महानगरपालिका व्दारा आयोजित ग्रामिण व जिल्हा स्तर व महानगर पालिका स्तरावर सुब्रोतो मुखर्जी आंतरराष्ट्रीय फुटबॉल कप सब ज्युनियर व ज्युनियर स्पर्धा 2022-23 आयोजित केल्या जाणार आहेत. या शासकीय स्पर्धेत भाग घेण्यासाठी 11 जुलै 2022 पर्यंत जिल्हयातील शाळांनी, महाविद्यालयांनी आपल्या प्रवेशिका जिल्हा क्रिडा कार्यालय, अहमदनगर येथे जमा कराव्यात किंवा 8087076633 या व्हॉट्सॅप नंबरवर पाठवाव्यात. स्पर्धेचा सविस्तर कार्यक्रम स्पर्धा हा शाळांना कळविला जाईल. अधिक माहितीसाठी विशाल गर्जे (क्रीडा मार्गदर्शक) जिल्हा क्रीडा कार्यालय, अहमदनगर भ्रमणध्वीन क्र. 8087076633/8369539077, व विल्सन फिलीप्स- मनपा क्रीडा विभाग प्रतिनिधी भ्रमणध्वनी क्र. 9420796140 यांच्याशी संपर्क साधावा असे जिल्हा क्रीडा अधिकारी, अहमदनगर यांनी प्रसिध्दी पत्रकात नमूद केलेआहे.