प्रशासकिय
राज्य निवडणूक आयोगाने अहमदनगर जिल्हा परिषदेचे ८५ गट व पंचायत समितीचे १७० गण रचनेचा कार्यक्रम केला जाहीर!

अहमदनगर दि.१२ मे (प्रतिनिधी):-अहमदनगर जिल्हा परिषदेचे ८५ गट व पंचायत समितीचे १७० गण रचनेचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.यावेळी अहमदनगर जिल्ह्यात पूर्वीच्या तुलनेत १२ गट व २४ गण वाढले आहेत.जिल्हा परिषदेची मुदत २० मार्चला संपुष्टात आली व त्यावर सीईओ यांची प्रशासक म्हणून राज्य सरकारने नियुक्ती केली.त्यापूर्वी १४ मार्चला पंचायत समित्यांची मुदत संपुष्टात आल्याने तिथं गट विकास अधिकारी प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले.जिल्हा परिषदेची तालुकानिहाय नवी सदस्यसंख्या पुढीलप्रमाणे अकोले ६,संगमनेर १०,कोपरगाव ७,राहाता ६,श्रीरामपूर ५,नेवासे ८,देवगाव ५,नगर ७,राहुरी ६,पारनेर ६,श्रीगोंदे ७, कर्जत ५ व जामखेड ३ या संख्येच्या दुप्पट तालुकानिहाय गणांची संख्या असेल.२ ते ६ जून दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकती व सूचना दाखल करता येतील.