राजकिय

महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ भाजपच्या शहरात प्रचार फेऱ्या

अहिल्यानगर दि. 15 नोव्हेंबर (प्रतिनिधी )- महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ भाजपच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरात विविध भागांमध्ये प्रचार फेऱ्या काढण्यात येत आहेत. या प्रचार फेरीमध्ये भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होत उमेदवार संग्राम जगताप यांना मतदान करण्याचे आवाहन नागरिकांना करीत आहेत.
यावेळी अभय आगरकर म्हणाले नगर शहरामध्ये महायुतीला चांगले वातावरण असून उमेदवार आ.संग्राम जगताप यांना चांगला प्रतिसाद सर्व भागातून मतदार बंधू भगिनी देत आहेत. आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या विकास कामांच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढवण्यात येत आहे. राज्यातील महायुती सरकारने नगर शहराच्या विकासासाठी दिलेल्या कोट्यावधी रुपयांच्या निधीमुळे नगर शहरांमध्ये सर्व भागांमध्ये विकास कामे प्रगतीपथावर आहेत. भविष्यात राज्य सरकारकडून आणखीन भरीव निधी प्राप्त होण्यासाठी नगरमधून संग्राम जगताप यांचा विजय होणे आवश्यक आहे. यासाठी नागरिकांनी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान करून महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांना बहुमताने विजयी करावे, असे आवाहन केले.
यावेळी ज्येष्ठ नेते सुनिल रामदासी , मालन ढोणे , प्रशांत मुथा , संजय ढोणे, अजय ढोणे, दत्ता गाडळकर , पंडित वाघमारे , कालंदी केसकर , अभिजीत ढोणे, प्रवीण ढोणे ,सुरेखा विद्ये, राजू मंगलारप , प्रिया जानवे , श्री.फुलारी , सविता कोटा , ज्योती दांडगे , शुभम जाधव , राहुल मुथा, बंटी ढापसे , ज्ञानेश्वर काळे , राजू विधे , वैभव लांडगे , गोपाल वर्मा , राहुल रासकर , श्वेता पांधडे, मयूर बोचुघोळ , साहिल शेख , ज्ञानेश्वर भांगे , राजू वाडेकर , अमोल निस्ताने , मिलिंद गंधे , गोकुळ काळे , अर्चना बनकर , बाळासाहेब गायकवाड , ज्ञानेश्वर धिरडे , भार्गव फुलारे , रुद्रेश अंबाडे , विकी आव्हाड , कैलास शिंदे , केतन घोधडे , प्रताप परदेशी , प्रशांत आडेप , अजित कोतकर , तन्मय बारसे , महेश साबळे , युवराज ससाणे , सोनू बोरुडे , रोहीत परदेशी , दीपक उमाप , राखी आहेर आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे