धार्मिक

“तुझेच धम्मचक्र फिरे जगावरी” 67 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन दरेवाडी गावात आनंदात साजरा

दरेवाडी दि.25 ऑक्टोबर (प्रतिनिधी ) नगर तालुक्यातील दरेवाडी गावात नुकताच 67 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठया आनंदी वातावरणा मध्ये साजरा करण्यात आला.यावेळी दरेवाडी गावातून सर्व बौद्ध उपासकांच्या वतीने सायंकाळी धम्मरॅली काढण्यात आली होती. या रॅलीचा समारोप येथील बुद्ध विहारात करण्यात आला. यावेळी भन्तेजी संजय कांबळे यांनी बुद्ध वंदना घेऊन बुद्धधम्मावर उपस्थित उपासकांना मार्गदर्शन करत प्रवचन दिले.यावेळी दरेवाडी गावचे सरपंच अनिल करांडे यांचे सर्व धम्म बांधवांना शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाऊ भिंगारदिवे सिद्ध भिंगारदिवे, गणेश बेडेकर संदीप कांबळे महेश भिंगारदिवे अविनाश बेडेकर सुरेश भिंगारदिवे रोहीदास भिंगारदिवे, संजय बेडेकर नविन भिंगारदिवे तसेच गौतमी भिंगारदिवे, आकांशा भिंगारदिवे, आरती बेडेकर मिरा देठे सीमाताई, अविनाश गायकवाड, सिंधु पातारे, यतिन देठे कुसुम भिंगारदिवे आदींनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे