जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता इंजिनीअर , ठेकेदार, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच ,उपसरपंच, ग्रामसेवक यांनी केला चार लाखाचा रस्ता भ्रष्टाचार!

अहमदनगर दि.२४ (प्रतिनिधी) नगर तातुक्यातील खारेकर्जुने येथे रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
खारेकर्जुने येथील चार लाख रूपयांचा रस्ता जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता इंजिनीअर ठेकेदार ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यांनी संगत मत करून चार लाख रुपये गिळं क्रृत केले असल्याचे जेव्हा सामाजिक कार्यकर्ते संजू भाऊ बोरूडे यांनी फेसबुकवर लाईव्ह रस्ता दाखवून दिला. तेव्हा सर्व प्रकार उघडकीस आला होता. नंतर लहानू देवराम बोरूडे व कैलास लाडे यांनी तक्रार अर्ज दाखल केले. जेव्हा देशस्तंभ न्यूज पोर्टलवर हि बातमी प्रसिद्ध झाली. तेव्हा तेव्हा भ्रष्टाचारी ठेकेदार ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच ग्रामसेवक सर्व एकत्र येत तीन महीने हा सर्व प्रकार दाबून ठेवून मागील आठवडय़ात इंजिनीअर झावरे व ग्रामसेवक ठेकेदार सरपंच उपसरपंच सदस्य यांनी मुरमीकरन रस्त्यावर दोन गाड्या मुरम टाकून सेटलमेंट केली. जेव्हा सामाजिक कार्यकर्ते संजू भाऊ बोरूडे यांनी जिल्हा परिषद इंजिनीअर झावरे यांना फोन करून विचारना केली की सर आपन रस्ता मुरमीकरन न करता पाच सहा महिन्यांपूर्वीच ठेकेदार यांना बिल पास करून देण्यात आले होते. मग जेव्हा आम्ही आपला सर्व भ्रष्टाचार बाहेर काढून जनतेसमोर घेऊन आलो. तेव्हा तुम्ही सबंधित लोकांना हाताशी धरून रस्त्यावर मुरमीकरन करत आहेत तेव्हा इंजिनीअर झावरे यांनी सामाजिक कार्यकर्ते संजू भाऊ बोरूडे यांना उडवा उडवीची उत्तर देऊन आपन कार्यकारी अभियंता यांना विचारा असे बोलून फोन कट केला. संजूभाऊ बोरूडे व सर्व सामाजिक कार्यकर्ते व शबरी आवास येथील भिल्ल समाज व दलित समाज मातंग समाज आपल्या पारंपरिक वाद्यांनी या भ्रष्टाचाराविरुद्ध जिल्हा परिषद येथे आंदोलन करणार आहेत. जोपर्यंत सबंधित भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहील असा इशाराच देण्यात येणार आहे. यावेळी बोलतांना सामजिक कार्यकर्ते संजय बोरुडे यांनी अजून गावातीलच लाखो रुपयांचा रस्ता घोटाळा लवकरच उघडकीस आणणार असल्याची माहिती दिली आहे.