हभप केशव महाराज गुजर पंढरीचा वारकरी पुरस्काराने सन्मानित

शेवगाव ( प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. राजश्रीताई घुले यांचे.शुभहस्ते श्री क्षेत्र अव्हाणे येथील निष्ठावंत वारकरी ह.भ.प. गुरुवर्य ,केशवमहाराज गुजर यांना प्रदान करणेत आला.
श्री क्षेत्र वरुर येथील शंभु महादेव व भक्त पुंडलीक राय
यांचे प्राणप्रतिष्ठा वर्धादिनामनिमित्त महाशिवरात्रीच्या पर्वकालात गेली अठ्ठावीस वर्षापासुन चालत आलेला अखंड हरीनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायन आयोजन करण्यात आले होते.
दरवर्षी काल्याचे किर्तना चे पुर्वसध्येंला वरील पढंरीचा वारकरी पुरस्कार चे वितरन होत असते.
या वर्षी ८१ वर्ष वयाचे गुरुवर्य ह भ प केशव महाराज गुजर यांना वरील पुरस्कारचे वितरण करण्यात आले. गुजर महाराज हे १९८५ पासुन माउली सोहळा वारीचे संत रोहिदास महाराज दिँडी क्र.१२१ चे चालक असून आजतागायत दिंडी चे प्रस्तान होत असते.
भक्त पुंडलीक देवस्थान समिती तर्फे सलग तीन वर्षापासुन *पंढरीचा वारकरी* पुरस्कार तालुक्यातील अध्यात्म क्षेत्रातील महात्म्याना दिला जातो. या पुरस्कार चे हे तृतीय वर्ष आहे पुरस्काराची घोषणा ह भ प दिनकर महाराज अंचवले भक्तराज पुंडलीक देवस्थान समिती समस्त ग्रामस्त पंचक्रोशील प्रसिद्ध किर्तणकार,टाळकरी,वारकरी यांचे मान्यतेनुसार व शिफारशीनुसार समितीचे अध्यक्ष माणिकराव म्हस्के यांनी महाशिवरात्रीला घोषीत केले होते. त्याचे स्वरुप पांडुरंगरूख्मिणी ची मुर्ती,रोहिदास महाराजाचा फोटो फ्रेम,शाल श्रीफळ पंचा सह संपुर्ण वस्र असे आहे पहिल्या वर्षी वै.हभप सत्यविजय महाराज कोरडगावकर व्दितीय वर्षी वै.हभप कृष्णदेव महाराज काळे यांना प्रदान करण्यात आला होता व यावर्षीचा पुरस्कार वितरण दि.८/३/२०२२ मंगळवार रोजी मा.ना.सौ,राजश्री ताई घुले ,भागवताचार्य ह भ प दिनकर महाराज अंचवले ,गुरुवर्य हभप राम महाराज झिंजुर्के, ह भ प उदबोध्द महाराज संजय कोळगे समितीचे अध्यक्ष माणिकराव म्हस्के, नानासाहेब वावरे गुरुजी,विष्णु पा म्हस्के,मधुकर वावरे,निलेश मोरे सर,वामनआबा म्हस्के,मुरलीधर म्हस्के,आसाराम चितळे, यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले या प्रसंगी पंचक्रोशीतील कीर्तनकार,भजनी टाळकरी हरीभक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आदिनाथ मारुती वावरे सर व कल्याण मारुती शेळके यांचे कडुन काल्याच्या महाप्रसादाचे पंगतीने सांगता झाली तर ग्रामस्थांच्यावतीने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा, वरून ग्रामस्थांच्यावतीने राजश्रीताई घुले यांचेकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले यामध्ये प्रामुख्याने मागण्या भक्त पुंडलिक मंदिर परिसरामध्ये त्रिवेणी संगमावर घाट बांधून मिळावा, तसेच परिसरामध्ये झालेल्या बंधाऱ्यामुळे नदीमध्ये पाणी असते त्यामुळे वारकऱ्यांना पांडुरंगाच्या व भक्त पुंडलिकाच्या दर्शनासाठी येण्यासाठी अडचण निर्माण होते त्यामुळे अध्यक्ष महोदयांनी नदीच्या उत्तरेला भराव टाकून रस्ता करण्याकरिता निधी उपलब्ध करून द्यावा कारण महिन्याच्या वारीला सालवडगाव, खरडगाव, आखेगाव, कोरडगाव, थाटे,वाडगाव, येथील हजारो भाविक भाविक दर्शनासाठी येतात परंतु वाट नसल्यामुळे त्यांची खूप अडचण होते कार्यक्रमाची प्रस्तावना व आभार निलेश मोरेसर यांनी केले.