दिंडीतील वारकऱ्यांचे संरक्षणाकरीता वाहने सावकाश चालवा:शहर वाहतूक पोलिसांचे आवाहन

अहमदनगर दि. १२ जून (प्रतिनिधी)
अहमदनगर – दि. २९/०६/२०२३ रोजी आषाढी एकादशी असुन त्यानिमीत्ताने मोठया प्रमाणात वारकरी / भाविक पंढरपुर जि. सोलापुर कडे पायी दिंडी घेवुन जात आहेत. त्यापैकी श्री संत निवृत्ती महाराज व श्री संत निळोबाराय या प्रामुख्याने मोठया दिंडया अहमदनगर जिल्हयातुन पंढरपुरकडे जात आहेत. सदर दोन्ही दिंडयांमध्ये मोठया प्रमाणत वारकरीत असुन संत श्री निवृत्ती महाराज यांची दिंडी अहमदनगर शहरातुन जाणार आहे. सदर दिंडीमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण तसेच समस्या उद्भवणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने सर्व वाहनचालक यांना अवाहन करण्यात येते की, ज्या मार्गाने पायी दिंडी जाणार आहे त्या मार्गावरील वाहतुक दुसन्या बाजुचे लेनवरुन वळविण्यात येणार आहे, परंतु काही ठिकाणी अनाधिकृतरित्या रस्ते दुभाजक तोडलेले असुन सदर ठिकाणाहून काही अतिउत्साही वाहनचालक आपली वाहने भरधाव वेगाने घेवुन जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दिंडीतील वारकऱ्यांना वाहनांचा धक्का लागुन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यांना करण्यात येत आहे.
त्यामुळे सर्व वाहनचालक यांनी अहमदनगर जिल्हा हद्दीतुन आपले वाहन घेवून जात असतांना दिंडी चालत असलेल्या ठिकाणाहून पोलीसांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे व सावकाश आपले वाहन चालवावे असे अवाहन मा. श्री राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व मा. श्री. अनिल कातकाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग, अहमदनगर व शहर वाहतुक शाखा, पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम अहमदनगर यांचे वतीने सर्व वाहन चालकांना आव्हान केले आहे.