देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 30 ऑगस्ट : मा.श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंदयाची माहिती काढुन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
नमुद आदेशान्वये श्री.संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी पोलीस अंमलदार संदीप पवार, विजय ठोंबरे, अतुल लोटके, शाहीद शेख, बिरप्पा करमल, विकास साळवे, अमृत आढाव, सागर ससाणे, अरूण गांगुर्डे, दिपक जाधव, प्रकाश मांडगे, भाऊसाहेब काळे, मनोज साखरे, रोहित मिसाळ, गणेश लोंढे, निळकंठ कारखेले, संतोष खैरे, रमीजराजा आत्तार, सतीष भवर, अमोल आजबे अशांचे चार पथक तयार करून जिल्हयातील अवैध गुटखा, मावा व सुगंधीत तंबाखु व्यावसायिकांची माहिती काढुन, कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले.
दिनांक 29/08/2026 रोजी पथकाने एमआयडीसी, भिंगार कॅम्प, कर्जत व राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत सुगंधीत तंबाखु, मावा, गुटखा तयार करून विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढुन 06 विविध ठिकाणी छापे टाकुन कारवाई केली. पथकाने केलेल्या कारवाईमध्ये खालीलप्रमाणे 15 आरोपीविरूध्द 6 गुन्हे दाखल करण्यात येऊन एकुण 5,95,915/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अ.क्र. पो.स्टे. गुरनं व कलम जप्त मुद्देमाल किंमत आरोपीचे नाव
1 एमआयडीसी 691/2026 बीएनएस 123, 223, 274, 275 1,20,600/- 1) सचिन बबन डोंगरे, वय 41, रा.माजी सैनीक चौक, वडगाव गुप्ता, ता.जि.अहिल्यानगर
2) कय्यमु शेख पुर्ण नाव माहित नाही रा.मुकूंदनगर, अहिल्यानगर (फरार)
2 एमआयडीसी 692/2026 बीएनएस 123, 223, 274, 275 2,555/- 1) सतीष सुखदेव तोडमल, वय 39, रा.नागापूर, ता.जि.अहिल्यानगर
2) अजझर पठाण पुर्ण नाव माहित नाही, रा.मुकूंदनगर, ता.अहिल्यानगर (फरार)
3 कॅम्प 449/2026 बीएनएस 123, 223, 274, 275, 3(5) 4,45,200/- 1) ज्ञानेश्वर रमेश गायकवाड, वय 36, रा.विळदघाट, एमआयडीसी, ता.अहिल्यानगर
2) अमर शिवाजी ताठे, वय 23, रा.सहयाद्री चौक, नवनागापूर, ता.अहिल्यानगर
3) ऋषी काटकर, पुर्ण नाव माहित नाही रा.बीड (फरार)
4) शाफीन आरीफ शेख, वय 21, रा.मुकूंदनगर, ता.अहिल्यानगर
5) अल्तमश सय्यद पुर्ण नाव माहित नाही, रा.झेंडीगेट, अहिल्यानगर (फरार)
4 कर्जत 471/2026 बीएनएस 123, 223, 274, 275, 3(5) 2,160/- 1) गोविंद काळुराम जाधव, वय 29, रा.खेड, ता.कर्जत
2) धीरज कवितके पुर्ण नाव माहित नाही, रा.भिगवण, ता.इंदापूर, जि.पुणे (फरार)
5 कर्जत 472/2026 बीएनएस 123, 223, 274, 275, 3(5) 2,400/- 1) उमर अस्लम शेख, वय 27, रा.खेड, ता.कर्जत
2) अभि कवितके, पुर्ण नाव माहित नाही, रा.भिगवण, ता.इंदापूर, जि.पुणे (फरार)
6 राहुरी 975/2026 बीएनएस 123, 223, 274, 275, 3(5) 23,000/- 1) शोएब महमंद शेख, वय 36, रा.डिग्रस, ता.राहुरी
2) फारूक पठाण पुर्ण नाव माहित नाही, रा.सोनई, ता.नेवासा (फरार)
वरील कारवाई मा.श्री.मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा