गुन्हेगारी

मुकुंदनगर येथे कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. 120 किलो गोमांस जप्त व 04 गोवंशीय जनावरांची सुटका

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 24 एप्रिल :मा. श्री सोमनाथ घार्गे साहेब, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे ठिकाणांची व गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.
सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांचे मार्गदर्शनाखालील स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/अनंत सालगुडे पोलीस अंमलदार विष्णु भागवत, बाळासाहेब नागरगोजे, सोमनाथ झांबरे, रोहित येमुल, बाळासाहेब खेडकर, चालक उत्तरेश्वर मोराळे यांचे पथक तयार करुन सदर पथकास अहिल्यानगर शहरामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.
वर नमुद पथक दिनांक 24/04/2026 रोजी पहाटे अहिल्यानगर शहरामध्ये कत्तलखान्याची माहिती काढणे करिता पेट्रोलींग करीत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत मुकुंदनगर येथे मेहराज मज्जित दर्गा येथे इसम नामे जाकिर कुरेशी रा. सुबेदार गल्ली झेंडीगेट, अहिल्यानगर हा त्याचे साथीदारासह गोवंशीय जनावरांचे कत्तल करत असल्याची माहिती प्राप्त झाली. पथकाने तात्काळ बातमीतील ठिकाणी जावुन खात्री केली असता सदर ठिकाणी काही गोवंशीय जनावरे निर्दयतेने चारा पाणी विना डांबुन ठेवलेले व पत्र्याचे शेडमध्ये गोवंशीय जनावरांचे कत्तल केल्याचे दिसुन आले. पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला असता काही इसम पळुन गेले व एक इसमास ताब्यात घेवुन नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नांव 1) जाकिर शब्बिर कुरेशी वय- 58 वर्षे रा. सुबेदारगल्ली झेंडीगेट, अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले त्यास पळुन गेलेल्या इसमाबाबत विचारपुस करता त्याने त्याचे नांव 2) शेर रऊप कुरेशी, 3) नादिर अजिज कुरेशी दोघे रा. झेंडीगेट, अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले.
सदर इसमांचे ताब्यातुन 24,000/- रुपये किमतीचे 120 किलो गोमांस, 60,000/-रु कि.ची 04 गोवंशीय जनावरे, 700/-रु कि.चा 02 सत्तुर 01 सुरा, असा एकुण 84,700/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ताब्यातील आरोपीविरुध्द अहिल्यानगर कॅम्प पोलीस ठाणे गु.र.नं. 213/2026 प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5(अ), 5(ब), 9, सह प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याचे कलम 3, 11 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले असुन पुढील तपास अहिल्यानगर कॅम्प पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे