देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क :बीड जिल्हा(प्रतिनिधी-गोरख मोरे ) :
आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा येथील रहिवासी व सध्या उल्हासनगर येथे स्थायिक असलेले सौ.सुनीता-विक्रम सोनबा मोरे यांची सून व मच्छिंद्र विक्रम मोरे यांची पत्नी सौ.पुनम हिची ठाणे शहर पोलीस शिपाई पदी भरतीत निवड झाली.
सन २०२४-२०२५ मध्ये ठाणे येथे ६५४ पोलीस शिपाई पदासाठी भरती झाली होती.या भरतीमध्ये गृहिणी सौ.पुनम मच्छिंद्र मोरे हिने बौद्धिक /शारीरिक मेहनत घेऊन परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून ठाणे शहर पोलीस शिपाई भरतीत पुनम मच्छिंद्र मोरे हिने घवघवीत यश प्राप्त केले असून ठाणे शहर पोलीस शिपाई भरतीत सौ.पुनम मच्छिंद्र मोरे हिची निवड झाली.सौ.पुनम हिने पोलीस शिपाई भरतीसाठी खूप कष्ट आणि मेहनत घेतली . मेहनत -कष्ट आणि जिद्दीच्या जोरावरच यश प्राप्त केले असून ऑनलाइन सिरीयल यादी मध्ये ( ६६ ) क्रमांकावरती पुनम मच्छिंद्र मोरे नाव झळकले असून धानोरा गावच्या प्रथम सुनबाई सौ.पुनम मच्छिंद्र मोरे यांची ठाणे शहर पोलीस शिपाई पदी भरतीत निवड झाली असून सुनबाई सौ.पूनम मोरे हिने धानोरा गावासह सासू/सासरे/पती यांचे नाव मोठे केल्याने धानोरा येथील आजी/माजी सरपंच/उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,शैक्षणिक, सामाजिक,राजकीय, युवकवर्ग,मित्रपरिवार व धानोरा गावातील सर्व स्तरातील ग्रामस्थ,माता- भगिनींनी अभिनंदन केले असून सौ.पुनम मच्छिंद्र मोरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
ठाणे शहर पोलीस शिपाई सौ.पूनम मच्छिंद्र मोरे यांच्याशी आमचे प्रतिनिधी गोरख मोरे यांनी या यशा संदर्भात संपर्क साधून माहिती विचारली असता त्यांनी सांगितले की, या यशामागे सासू सुनिता, सासरे विक्रम व पती मच्छिंद्र विक्रम मोरे यांचा या यशामागे मोठा वाटा असल्याचे सांगितले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा