शिवजयंतीनिमित्त विशेष ऑनलाईन व्याख्यान

शिवजयंती विशेष ऑनलाईन व्याख्यान
केडगाव ( प्रतिनिधी)
केडगांव जागरूक नागरिक मंचाने श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने विशेष ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन केले आहे .
सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा.मा.श्री. सोमनाथजी गोडसे (मावळ) हे शिवरायांचे लोककल्याणकारी व लोकशाहीवादी विचार या विषयावर व्याख्यान करणार आहे.
शिवव्याख्यान गुरुवार दि.१७ फेब्रुवारी २०२२ सायं – ७.०० ते ८.०० या वेळेमधे होणार आहे.
या व्याख्यानाचे थेट प्रक्षेपण फेसबुक लाईव्ह व युट्यूब प्रक्षेपण देखिल होणार आहे तसेच झूम मिटींग Id , link, qr code वापरून शिवश्रोत्यांना ऑनलाईन जॉईन होता येणार आहे.
झूम मिटींग लिंक खाली देण्यात आली आहे .
https://us04web.zoom.us/j/78776106869?pwd=q0N3gKTPUVUW9Kk8t1yDre1yALmWdT.1
या शिवव्याख्यानाद्वारे छत्रपतींचे विचार लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत पोहचावेत . तसेच सर्व शाळांनी पुढाकार घेऊन सर्व विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहचवावी . कोरोना सद्यस्थितीचा विचार करून कार्यक्रमाचा आनंद घरूनच जास्तीत जास्त जनतेने घ्यावा व शिवरायांचे प्रेरणादायी विचार सर्वांपर्यंत पोहचवावे असे आवाहन मंचचे अध्यक्ष श्री.विशाल पाचारणे यांनी केले आहे .