देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर दि. 17 जानेवारी : अहिल्यानगर महानगर पालिकेची निवडणूक 15 जानेवारीला पार पडली, काल 16 जानेवारीला निकाल लागला.अहिल्यानगर प्रभाग 13 प्रभाग क्रमांक 13 मधून अनुसूचित जाती अ सुरेश लक्ष्मण बनसोडे, नागरिकांचा मागास प्रवर्ग ब पडोळे सुजाता महेंद्र (गोरख ), सर्वसाधारण महिला शेटीया अनिता विपुल, सर्व साधारण ड मधून अविनाश (तात्या ) हरिभाऊ घुले हे निवडणुक प्रभाग विकासाच्या मुद्यावर लढविली. राष्ट्रवादी पार्टी (अजित ) पवार गटाचे सर्व उमेदवार विजयी झाले,
प्रभाग क्रमांक 13 मधून विक्रमी मतांनी विजयी झालेले नगरसेवक सुरेशभाऊ बनसोडे यांनी त्यांचे सामाजिक, राजकीय गुरु माजी आमदार स्वर्गीय अरुण काका जगताप यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होऊन त्यांना आभिवादन केले. यावेळी अंकुश मोहिते, समीर भिंगारदिवे, सिद्धार्थ आढाव व कार्यकर्ते उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा