राजकिय

प्रभाग 9 ची निवडणूक मतदारांनी हातात घेतली आहे, शिवसेना शिंदे गटाचे सर्व उमेदवार निवडून येतील: संजय शेंडगे रॅलीचे ठिक, ठिकाणी नागरिकांकडून स्वागत!

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क: अहिल्यानगर, दि. 9 जानेवारी: अहिल्यानगर महानगर पालिकेच्या निवडणुकीत सर्वच प्रभागात शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी जोर धरला आहे. प्रभाग क्रमांक 9 मधून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय छगनराव शेंडगे
एस.सी. पुरुष (अ)
सौ. रुपाली संदिपभाऊ दातरंगे
नागरिकांचा मागास प्रवर्ग (ब)
सौ. वैशाली शाम (आप्पा) नळकांडे
सर्वसाधारण महिला (क)
सचिनभाऊ चंद्रशेखर शिंदे
सर्वसाधारण पुरुष (ड) हे या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. प्रभागातील सूडके मळा, आयर्न गार्डन, बागडे मळा, कॉस्मिक सोसायटी, जाधव मळा, ढोरवस्ती, आदी भागातून उमेदवारांनी रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी प्रभागातील नागरिकांनी मोठया आनंदाने रॅलीचे स्वागत करत, महिला मतदारांनी चारही उमेदवारांचे औक्षण करत आनंद व्यक्त केला.

यावेळी शिवसेनेचे उमेदवार व महानगर पालिकेचे माजी गट नेते संजय शेंडगे यांनी प्रसार माध्यमातून संवाद साधला, यावेळी ते म्हणाले, आम्ही रस्ते, वीज, ड्रेनेज लाईन, या विकास कामाच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जात असून ही निवडणूक प्रभागातील मतदारांनीच हातात घेतली आहे. त्यामुळे चारही उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी नगरसेवक अर्जुन दातरंगे, माजी महापौर रोहिणीताई शेंडगे, माजी नगरसेवक शाम (आप्पा) नळकांडे, संदीपभाऊ दातरंगे, आनंद दातरंगे, विक्रम बनकर, रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष सुनीलभाऊ शिंदे, मच्छिन्द्र सूडके, तसेच प्रभागातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. रॅलीचा समारोप निलक्रांती चौक येथे करण्यात आला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे