राजकिय

प्रभाग 8 चा सर्वांगीण विकास करण्यासाठी भारती विकास वाघमारे यांना विजयी करा : सुनील शिंदे अपक्ष उमेदवार भारती विकास वाघमारे यांना प्रभागातील मतदारांचा मोठा पाठिंबा

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : दि. 8 जानेवारी : अहिल्यानगर महानगर पालिका निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. प्रत्येक उमेदवाराचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे.
होणाऱ्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 8 च्या नागरिकांचे विविध प्रश्न आहेत. पिण्याचे पाणी, ड्रेनेज लाईन, रस्ते, घणकचरा गाडी, त्याचप्रमाणे नागरिकांच्या मलभूत समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी व प्रभाग 8 च्या सर्वांगीण विकासासाठी अपक्ष उमदेवार भारती विकास वाघमारे यांच्या शिट्टी चिन्हा समोरील बटन दाबून त्यांना विजयी करण्याचे आवाहन रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष सुनील शिंदे यांनी प्रभाग क्रमांक 8 मध्ये आयोजित केलेल्या बैठकीत मतदारांना केले.
यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख महेश भोसले, विकास रणदिवे, विवेक विधाते, आकाश खरपे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक बेबीताई टकले, शहर अध्यक्षा सुनीता शिंदे, शहर सचिव मंगल बरकडे, नेहा जावळे, पठारे आजी, सविता कवडे, उज्वला माळवे, अलका मैड, सोनाली खरपे, त्याच प्रमाणे प्रभागातील मतदार मोठया संख्येने उपस्थित होते. अपक्ष उमेदवार भारती विकास वाघमारे यांना नागरिकांमधून मोठा पाठिंबा मिळत असल्यामुळे त्यांचा विजय होण्याच्या चर्चा प्रभागातील मतदार करत आहेत. सदर बैठकीचे मंगल बरकडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन जिल्ह्याचे कार्याध्यक्ष बाळासाहेब वाघमारे यांनी केले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे