राजकिय

प्रभाग क्रमांक 9 ढोल, ताशांच्या गजरात शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी काढली रॅली! रॅलीला प्रभागातील मतदारांचा मोठा पाठिंबा!

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : दि. 7 जानेवारी : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत प्रचारात चांगलाच रंग भरत चालला आहे.

प्रभाग क्रमांक 9 शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार माजी गटनेते संजय छगनराव शेंडगे, रुपाली संदीपभाऊ दातरंगे,वैशाली शाम नळकांडे, सचिन चंद्रशेखर शिंदे उमेदवारांनी ढोल ताशांच्या गजरात बागोराजा हडको येथील हरिहरेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेत रॅलीची सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक अर्जुन दातरंगे व परिसरातील जेष्ठ नागरिक व महिलांच्या हस्ते रॅलीचे नारळ फोडण्यात आले.ही रॅली बागरोजा हडको, सातभाई मळा, दातरंगे मळा या भागातून काढण्यात आली होती. रॅलीचा समारोप मार्कडेय मंगल कार्यालय येथे करण्यात आला. यावेळी सदर रॅलीमध्ये महिला, तरुण मतदार, वृद्ध यांचा सहभाग उल्लेखनीय होता. एकंदरीतच प्रभागातील मतदारांचा मोठा पाठिंबा उमेदवारांना असल्याचे चित्र होते. यावेळी प्रभागातील विकास कामाच्या जोरावर चारही उमेदवार मोठया चर्चा नागरिकांमधून होत आहेत. यावेळी माजी महापौर रोहिणीताई शेंडगे, माजी नगरसेवक सुरेश तिवारी, माजी नगरसेवक शाम (आप्पा) नळकांडे, आनंद दातरंगे, नवग्रह मित्र मंडळाचे अध्यक्ष अमोल बनकर, जितेंद्र शिरसाठ,रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष सुनील शिंदे, महिला शहर अध्यक्ष सुनीता शिंदे, शहर सचिव मंगल बरकडे, सुनीता मोरे,अलका मैड, नंदा शिंदे, तसेच परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे