राजकिय
प्रभाग क्रमांक 9 शिवसेना उमेदवारांच्या प्रचारात रिपब्लिकन सेनेच्या महिला पदाधिकारी मैदानात! प्रभागातील मतदारांचे ठरलंय धनुष्यबाण जोरात चाललंय!


या पार्श्वभूमीवर प्रभाग 9 मधील शिवसेनेचे उमेदवार अनु. जाती, अनु. क्रमांक 3 संजय छगनराव शेंडगे, ओबीसी महिला अनु. क्रमांक 1 रुपाली संदीपभाऊ दातरंगे, सर्व साधारण महिला अनु. क्रमांक 1 वैशाली शाम नळकांडे,सर्वसाधारण पुरुष अनु. क्रमांक 3 सचिन चंद्रशेखर शिंदे या उमेदवारांच्या प्रचारात रिपब्लिकन सेनेच्या महिला पदाधिकारी मैदानात उतरल्या असून त्यांनी निलक्रांती चौक, गौतमनगर, जाधवमळा, बागडे मळा, सूडके मळा, लेंडकर मळा, परिसरातील मतदारांशी संवाद साधत
धनुष्यबाणाच्या उमेदवारांना मत देण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांना मतदारांकडून यावेळी आमचं ठरलंय धनुष्यच निवडून आणायचंय अशा चर्चा ऐकायला मिळत आहेत.