राजकिय

प्रभाग क्रमांक 15 शिवसेना, रिपब्लिकन सेना युतीच्या कार्यकर्त्यांनी जयभिम हौसिंग सोसायटीत मतदारांच्या भेटी घेत केला शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार धनुष्यबाणाला विजयी करण्याचे केले आवाहन

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क: अहिल्यानगर : दि. 6 जानेवारी : अहिल्यानगर महानगर पालिकेच्या निवडणुकीचा प्रचार चांगलाच रंगला आहे.सर्वत्र राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना राज्याचे एकनाथ शिंदे (शिंदे गट ) व रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांची युती आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 15 चे उमेदवार अनु जाती अनु. क्रमांक 4 प्रियंका परसराम गायकवाड, नागरिकांचा मागास प्रवर्ग अनु क्रमांक 2 सुवर्णा दत्ता जाधव, सर्वसाधारण महिला अनु क्रमांक 2 विद्या दिपक खैरे, अनु. क्रमांक 2 सर्वसाधारण अनिल माधवराव शिंदे उमेदवारांचा प्रचार करत जय भीम हौसिंग सोसायटी, रेल्वे कॉलनी, पंचशील नगर, गायकेमळा,इंगळे वस्ती, आदी परिसरातील मतदारांच्या भेटी घेत धनुष्यबाणाला विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष सुनील शिंदे, विकास रणदिवे, शिंदे सेनेचे विनोद गायकवाड, रिपब्लिकन सेनेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पत्रकार महेश भोसले, आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे