देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर दि. 31 ऑक्टोबर:
रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष इंदूमिल आंदोलनाचे प्रणेते सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार,आगामी होऊ घातलेल्या ज़िल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका निवडणुककीच्या अनुषंगाने मंगळवार दि. 4 नोव्हेंबर 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील शासकीय विश्रामगृह येथे सकाळी 11.30 वाजता शहर, व जिल्हाव्यापी महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर महत्वपूर्ण बैठकीत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका सार्वत्रिक निवडणुका याबाबतीत चर्चा होणार असून,
घरकुलापासून वंचित असलेल्या गोर गरिबांना घरकुल मिळवण्यासाठी रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून शासन दरबारी पाठपुरावा करणे, तसेच नव्याने जिल्हा कार्यकारिणी मध्ये महत्वाच्या पदावर नेमणूका करण्यात येणार आहेत, नवीन इतर पक्षातील कार्यकर्ते यांचा जाहीर पक्षप्रवेश करण्यात येणार असल्याची माहिती रिपब्लिकन सेनेचे दक्षिण जिल्हा सुनील शिंदे यांनी दिली आहे. या महत्वपूर्ण बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख महेश भोसले, युवा जिल्हा अध्यक्ष अतुल भिंगारदिवे, जेष्ठ नेते संजय ताकवले, विकास रणदिवे, विवेक विधाते, सनी माघाडे तसेच पक्षातील पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा