ब्रेकिंग

जिल्हा रुग्णालयातील “तो कक्षसेवक ” निवृत्तीच्या सहा महिन्यांतरही शासकीय सेवेतील कोणत्याही देयकांपासून अजूनही वंचित 39 वर्षाच्या सेवेनंतरही पदरी उपेक्षाच! कक्ष सेवकांने केली शासनाच्या 104 या पोर्टल वर संबंधित लिपिक व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याविरुद्ध तक्रार

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क: अहिल्यानगर : दि: 11 ऑक्टोंबर ( प्रतिनिधी ) जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर येथील निवृत्तीच्या सहा महिन्यानंतरही शासकीय सेवेतील कोणत्याही देयकांपासून तो कक्ष सेवक अजूनही वंचित असल्याची धक्कादायक माहिती समोर देशस्तंभ न्यूजच्या समोर आली आहे.त्या कक्षसेवकाची अक्षरशः उपासमार होतेय,39 वर्षाच्या सेवे नंतरही त्यांच्या पदरी उपेक्षाच पडली. याबाबत सेवा निवृत्त कक्ष सेवकाने देशस्तंभ न्यूज समोर आपली कैफियत मांडली.
दत्तात्रय लक्ष्मण आनंदकर राहणार मांडवगण तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर असे त्या कक्ष सेवकाचे नाव असून ते 31 मे 2025 रोजी सेवानिवृत्त झाले. विशेष म्हणजे निवृत्त होण्याच्या दहा महिने अगोदर त्यांची कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालय येथे बदली करण्यात आली होती. त्यांचे निवृत्त झाल्यापासून आत्तापर्यंत शासकीय सेवेतील पाचवा वेतन आयोग व सहाव्या वेतन हप्ते जमा झाले नाहीत तसेच शासकीय सेवेतील कोणतीही देयके मिळालेली नाहीत. याबाबत ते जिल्हा शल्य चिकित्सक संजय घोगरे यांना वेळोवेळी भेटून सांगितले असता, “तु त्या क्लार्कची झेड काढली असेल” अशी थट्टेची, चेष्टा मस्करीची, उडवा,उडवी ची उत्तरेच पदरी पडली. याबाबत आनंदकर हे रवींद्र काळदाते या लिपिकाला भेटले असता, सी. एस. सरांनी 40 हजार सांगितले आहेत. त्यानुसार आनंदकर यांनी उसनवारी करत कसेबसे चाळीस हजार रुपये दिले. पुढील सर्व कामासाठी अजूनही पैसे लागतील असे देखील आनंदकर यांना काळदाते याने सांगितले.
विशेष म्हणजे काळदाते याच्यावर याच्या अगोदर औषधाचे बिल मंजूर करण्यासाठी अहिल्यानगर येथील लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयाने पैसे मागितल्याच्या कारणावरून कारवाई देखील केलेली आहे.
वास्तविक पाहता निवृत्त झाल्यानंतर एक महिन्यामध्ये संबंधित निवृती कर्मचाऱ्यांची सर्व देयके अदा करण्यात यावीत असा शासनाचा आदेश (जीआर) आहे.शासनाच्या आदेशालाच लिपिक काळदाते व जिल्हा शल्य चिकित्सक संजय घोगरे यांनी अक्षरक्ष: केराची टोपली दाखवलेली आहे. हेच यातून दिसते आहे. या सर्व मानसिक व आर्थिक त्रासाला कंटाळून दत्तात्रय आनंदकर या कक्ष सेवकाने शासनाच्या 104 या पोर्टलवर तक्रार दाखल केली आहे. याबाबत शासन जिल्हा शल्य चिकित्सक व लिपिक काळदाते यांच्यावर काय कारवाई करणार याकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील आरोग्य विभागातील कर्मचारी तसेच जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे