गावठीकट्टा व काडतुस बाळगणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद!

अहमदनगर दि. २८ जून (प्रतिनिधी) गावठीकट्टा व काडतुस बाळगणाऱ्या आरोपीस जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, जिल्हा पोलिस अधीक्षक मा. श्री. राकेश ओला साहेब,
यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थागुशा अहमदनगर यांना आगामी सण उत्सव अनुषंगाने जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे विरुध्द जास्तीत जास्त कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे या बाबत माहिती घेताना दिनांक 26/06/23 रोजी पोनि/श्री. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, इसम नामे अशोक कराळे रा. श्रीगोंदा हा त्याचेकडील लाल रंगाचे हुंडाई कार मधुन गावठी कट्टा व जिवंत काडतुस विक्री करण्यासाठी शिर्डी येथुन बेलवंडी, ता. श्रीगोंदा येथे घेवुन जाणार आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेत हजर असलेले पोसई/सोपान गोरे, रविंद्र कर्डीले, रविंद्र घुगांसे सचिन आडबल, संतोष खैरे, शरद बुधवंत, विजय ठोंबरे, फुरकान शेख, पोकॉ/रणजीत जाधव व शिवाजी ढाकणे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांना बोलावुन प्राप्त माहिती कळविली व पंचाना सोबत घेवुन, खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले व तात्काळ पथकास रवाना केले.
पथकाने लागलीच नगर मनमाड रोडने जावुन कॉटेज कॉर्नर, सावेडी अहमदनगर येथे सापळा लावुन थांबलेले असताना थोडाच वेळात एक लाल रंगाची हुंडाई कार येताना दिसली. पथकाची खात्रीहोताच त्यास हात दाखवुन थांबण्याचा इशारा करता वाहन चालकाने ताब्यातील वाहन थांबवले. वाहन चालकास पोलीस पथक व पंचाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) अशोक लक्ष्मण कराळे वय 48, रा. विसापुर, ता. श्रीगोंदा असे असल्याचे सांगितले. त्यास गाडीचे खाली उतरवुन त्याची पंचा समक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीमध्ये एक गावठी बनावटीचा कट्टा व तीन जिवंत काडतुस मिळुन आले. त्याबाबत त्यांचेकडे बारकाईने विचारपुस करता त्याने गावठी कट्टा व जिवंत काडतुस विक्री करण्याचे उद्देशाने घेवुन जात आहे अशी कबुली दिली.
इसम नामे अशोक लक्ष्मण कराळे यास कॉटेज कॉर्नर, सावेडी अहमदनगर येथुन 30,000/- रुपये किंमतीचा एक गावठी कट्टा, 1500/- रुपये किंमतीचे तीन जिवंत काडतूस व 5,00,000/- रुपये किंमतीची एक लाल रंगाची हुंडाई कार असा एकूण 5,31,500/- रु. किं.चा मुद्देमाल बेकायदेशिरित्या कब्जात बाळगताना मिळून आल्याने सदर बाबत पोकॉ/2514 रणजीत पोपट जाधव, ने. स्थागुशा यांनी तोफखाना पोस्टे येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गु.र.नं. 922/23 आर्म ऍ़क्ट 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील कायदेशिर कार्यवाही तोफखाना पोस्टे करीत आहे.
सदर कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर, मा. श्री. अनिल कातकाडे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.