देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क :अहिल्यानगर, दि. २ – पारनेर नगर पंचायतीमधील ७ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोनशीला अनावरण करून करण्यात आला. विकासकामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण व्हावीत, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
यावेळी आमदार काशिनाथ दाते यांच्यासह नगरपंचायतचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
नगरपंचायत हद्दीतील विविध प्रभागात या ७ कोटी रुपयांच्या निधीचा वापर करून पथदिवे, रस्त्यांचे डांबरीकरण, काँक्रीटीकरण, सभामंडप व चौक सुशोभीकरण यासह इतर विविध कामे केली जाणार आहेत.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा