ब्रेकिंग
कायनेटिक इंजिनियर कंपनीच्या जेवणात आढळल्या आळ्या, मुंग्या, डोक्याचे केस, आणि झुरळ! पिण्याच्या पानात पाण्यात आढळलेली पाल अन्न औषध प्रशासन अजूनही झोपेत कामगारांच्या काम जीवाशी खेळण्याचा प्रकार रिपब्लिकन सेना करणार मोठे आंदोलन


त्यामध्ये अक्षरशः अळ्या डोक्याचे केस झुरळ मुंग्या तसेच पिण्याच्या पाण्यामध्ये पाल आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
कंपनीतील कामगारांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रश्न अत्यंत गंभीर असून कंपनी व्यवस्थापन यांना वेळोवेळी तक्रार करूनही कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याची देखील माहिती समोर आली आहे.
याबाबत रिपब्लिकन सेनेचे युवा जिल्हाध्यक्ष अतुल भिंगारदिवे यांनी कायनेटिक कंपनीतील कॅन्टीनमध्ये समक्ष भेट देऊन जेवणाची तसेच पाण्याची पाहणी केली.
याबाबत लवकरात लवकर कारवाई न झाल्यास रिपब्लिकन सेना मोठे आंदोलन उभा करणार असल्याचा असल्याचा इशारा देण्यात आला आहे. कामगारांच्या या अति महत्त्वाच्या अति गंभीर प्रश्नावर अन्न आणि औषध प्रशासन काय कारवाई करते आहे? यावर कामगार व नगरकरांचे लक्ष लागले आहे.