सूर्यासारखे तळपून जावे क्षितिजावरून चालताना शिखरांनीही प्रणाम करावा चांदे खुर्द खुरंगेवाडी च्या यशस्वी हिऱ्यांच्या आदर्श कार्याला!

चांदे खुर्द दि.३० मे (प्रतिनिधी दि २९/०५/२०२३ रोजी चांदे खुर्द येथे एक छोटासा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये चांदे खुर्द, खुरंगेवाडी येथील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. कर्जत तालुक्यातील असणाऱ्या या छोट्याश्या गावातील विद्यार्थ्यांनी अशी कामगिरी केली की त्याची चर्चा संपूर्ण पंचक्रोशीत होत आहे या खुरंगेवाडी येथिल तब्बल 10 जण पोलीस दलात तर काहींची अग्निशमन दलात त्यांची नियुक्ती झाली तसेच चांदे खुर्द येथील विद्यार्थ्यांनी डॉक्टर, आयुर्वेदिक डॉक्टर यांची गुणवत्ता प्राप्त केली. त्याबद्दल त्यांचे गावातली ग्रामस्थांचा वतीने सत्कार व व गावाचे नाव लवकिक केल्याबद्दल आभार मानण्यात आले. यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे-१) श्री.भाऊसाहेब शिवाजी शिंगाडे (मुंबई पोलीस)
२) श्री. प्रज्वल बापू शिंगाडे (मिरा भाईंदर)
३) श्री. प्रेम संतोष खुरंगे (मिरा भाईंदर)
४) कु. शितल राजेंद्र शिंगाडे(मुंबई पोलीस)
तसेच मुंबई महानगरपालिका अग्निशमन दलात
१) राम राजेंद्र शिंगाडे
२) शाम राजेंद्र शिंगाडे
३)हर्षदा बाळासाहेब पवार
४) निता दशरथ खुरंगे
५) संदीप भाऊसाहेब खुरंगे (M.S.F)
६) ऋषिकेश नामदेव खुरंगे (डाक विभाग)
७) कु. हर्षदा बबन सूर्यवंशी (मेडिकल ऑफिसर कर्जत)
८) गणेश नामदेव तरटे (आयुर्वेदिक डॉक्टर) या सर्व गुणवंत विद्यार्थी यांनी गावाची शान वाढविली त्याबद्दल त्यांचे मनापासुन आभार व्यक्त करण्यात आले यावेळी चांदे खुर्द खुरंगेवाडी च्या ग्रामसेविका श्री. सौ. काळोखे मॅडम. गावचे सरपंच श्री.सौ.संगीता शिंगाडे मॅडम उपसरपंच श्री.सौ.उषाताई खुरंगे व चांदे खुर्द खुरांगेवाडी चे विकास सोसायटी चे चेरमन मा.श्री.शत्रुघ्न सूर्यवंशी व सर्व सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.