राजकिय

सुरेश बनसोडे भविष्यात महाराष्ट्रात प्रखर हिंदुत्वचा प्रचार, प्रसार करणार! तोफखाना भागातील तरुणांनी केला विश्वास व्यक्त!

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क: अहिल्यानगर: दि. 2 जुलै (प्रतिनिधी) शिव, फुले, शाहू, आंबेडकरी चळवळ व हिंदुत्ववाची बुलंद तोफ राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष सुरेश बनसोडे यांनी आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या समर्थनार्थ सकल हिंदू समाज व हिंदूवादी संघटनेच्या वतीने आयोजित सभेत
जिहाद्यांविरुद्ध घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे त्यांची संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार चर्चा आहे.
त्यांच्या प्रखर हिंदुवादी भूमिकेमुळे सुरेश बनसोडे भविष्यात महाराष्ट्रात प्रखर हिंदुत्वचा प्रचार, प्रसार करतील असा विश्वास तोफखाना भागातील तरुणांनी व्यक्त केला.
तोफखाना भागातील तरुण मित्र मंडळाच्या वतीने नुकताच सुरेश बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी उपमहापौर दिपक सूळ,सूरज जाधव सूरज जाधव, सारंग पंधाढे अभिजित चिप्पा, अक्षय अडपे, चेतन अरकन, निखिल कांबळे, ओम पुंड, अंकुश मोहिते, सिद्धार्थ आढाव, समिर भिंगारदिवे, यश पंधाडे,बबलू सुपेकर, अक्षय डाके, भैय्या मुंडलिक, ओम कांबळे आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे