देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : दि. 2 जुलै (प्रतिनिधी) अखेर अहिल्या नगरचे नगर शहर मतदार संघांचे आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांची काल मुबंई येथे भेट घेतली.
अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रखर हिंदुत्ववादी भूमिकेनंतर त्यांच्या पुढील राजकीय प्रवासासंबंधी विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीला बोलावूनही आमदार जगताप त्यांना भेटण्याचे टाळत असल्याचेही बोलले जाते.
अहिल्यानगरमध्ये या चर्चा सुरू असताना मंगळवारी मुंबईत अजितदादा आणि आमदार जगताप एकत्र आलेले दिसले. हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनप्रसंगी या दोघांचे एकत्र छायाचित्र स्वत: आमदार जगताप यांनीच सोशल मीडियात शेअर केले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा