राष्ट्रीय पाठ शाळेने स्वच्छते विषयी प्रेरणा देण्यासाठी गाडगेबाबांच्या पुण्यतिथीला’ स्वच्छता दूत’ हा पुरस्कार द्यावा-पोलीस उपाधीक्षक प्रवीण लोखंडे

नगर दि 21 डिसेंबर (प्रतिनिधी ):- शहरातील जिल्हा सहकार बँकेसमोरील स्टेशन रोड येथील राष्ट्रीय पाठशाळा हायस्कूल व श्री संत गाडगे महाराज छात्रालय येथे संत गाडगे महाराज यांची 67 वी पुण्यतिथी कार्यक्रम लाचलुचपत विभागाचे पोलीस उपाधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला .
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लाचलुचपत विभागाचे पोलीस उपाधीक्षक शप्रवीण लोखंडे साहेब व प्रमुख पाहुण्या हायजिन फर्स्ट च्या अध्यक्षा .सौ .वैशाली गांधी या होत्या.
संत गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्त विद्यार्थी व शिक्षकांनी सकाळी शहरातील मुख्य बाजारपेठेतून स्वच्छता फेरी काढली व या निमित्त शहरातील चौका -चौकात स्वच्छता केली .तसेच एस .टी .स्टँड परिसरात साफसफाई केली व संत गाडगे महाराज यांना कृतीतून विद्यार्थ्यांनी अभिवादन केले. विद्यार्थ्यांनी “गोपाला गोपाला , देवकीनंदन गोपाला” हे संत गाडगेबाबांचे भजन म्हणत परिसर दणाणून सोडला. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस उपाधीक्षक प्रवीण लोखंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की ,”संत गाडगेबाबा हे कृतिशील संत होते ,त्यांनी स्वतःच्या कृतीतून स्वच्छतेचा संदेश जनमनामध्ये बिंबवला. लोक जागृती करताना शिक्षणाचे महत्त्व ते सांगत ते म्हणत ‘शिक्षणासाठी घरातील जेवणाचे ताट विका परंतु मुलांचे शिक्षण करा’. तुम्ही कर्जबाजारी होऊ नका. शिक्षणाने शहाणपण येते .असे गाडगेबाबा आवर्जून सांगत ग्राम स्वच्छतेबाबत गाडगेबाबा आग्रही होते .त्यांना ढोंगीपणा आवडत नसे .आणि गाडगे महाराज स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छते सुरुवात करीत असत त्यामुळे आपोआपच इतर लोक त्यांचे अनुकरण करत असत .आज विद्यार्थ्यांनी गाडगेबाबांच्या उपदेशानुसार स्वतः कचरा उचलून कुंडीत टाकावा ,आपला परिसर ,आपली शाळा स्वच्छ ठेवावी. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच स्वच्छतेची व स्वयंशिस्तीची सवय लावून घ्यावी.
शाळेने देखील स्वच्छते विषयी प्रेरणा देण्यासाठी गाडगेबाबांचे पुण्यतिथीला’ स्वच्छता दूत’ हा पुरस्कार द्यावा, की जेणेकरून विद्यार्थी या प्रेरणेने स्वतः स्वच्छता पाळतील आणि इतरांसाठी सुद्धा स्वच्छतेचे आदरणीय अशा प्रकारचे वर्तन करतील .
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी वैशाली गांधी यांनी आपल्या मनोगतातून स्वच्छतेचे महत्व सांगितले, तसेच हायजिन फर्स्ट या संस्थेचे कार्याविषयी माहिती दिली. गाडगेबाबा विषयी बोलताना त्या म्हणाल्या की ‘अंधश्रद्धा निर्मूलनाचा आग्रह गाडगेबाबा धरत .गाडगेबाबा हे आपल्या दैनंदिन आचरणातून स्वच्छतेचा संदेश देत. आणि त्यांच्या या उपदेशाचे आपण अनुकरण करावे .असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रम प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक जगन्नाथ बोडखे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले व आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना गाडगेबाबांचे जीवन परिचय व जीवनाचे आदर्श याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वस्तीग्रहाचे अधीक्षक बाबासाहेब पातकळ यांनी केले. त्यांनी प्रास्ताविकातून पुण्यतिथीच्या कार्यक्रमाचे औचीत्य सांगितले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक .सतीश काळे यांनी केले तर आभार शिक्षक प्रवीण उकिर्डे यांनी मानले कार्यक्रमासाठी शिक्षक. बाबासाहेब लोंढे,गणेश काथवटे,रामनाथ घनवट, काथवटे ,कविराज बोटे ,सुशील ननवरे,संजय सकट ,तुकाराम विघ्ने,राहुल लबडे,विजय वाणी इत्यादी उपस्थित होते.