सांगलीत ना.जितेंद्र आव्हाड युवा मंचची बैठक!

सांगली (प्रतिनिधी) फुले,शाहू,आंबेडकरी विचार मानणारे पुरोगामी विचार संपूर्ण महाराष्ट्रात पोहचविण्यासाठी धडपडणारे राज्याचे गृहनिर्माण मंत्री नामदार जितेंद्र आव्हाड युवा मंच बैठकआज सांगली येथे मंचचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष ॲड. प्रमोद सरोदे यांच्या नेतृत्वाखाली जितेंद्र आव्हाड युवा मंच, सांगली जिल्हा आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पद नियुक्ती चा कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी बैठकीस जितेंद्र आव्हाड युवा मंचचे पश्चिम महाराष्ट्र अद्यक्ष मोबीन मुल्ला(अष्टेकर) हे उपस्थित होते.यावेळी सांगली जिल्ह्यातील जिल्हा कार्यकारणी व विविध तालुक्यातील पदाधिकारी निवडी करण्यात आल्या. येणाऱ्या काळात शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा वसा आणि वारसा चालवण्यासाठी आव्हाड साहेबांच्या माध्यमातून मंच सक्रिय राहील. तसेच पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शनही करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष भालचंद्र ढोबळे, विशाल ढोबळे तसेच विविध तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.*