प्रशासकिय
मास्कचा वापर करा व गर्दीत सुरक्षित अंतर ठेवा:आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत

मुंबई :चीनसह अन्य देशात कोरोना विषाणूचा बीएफ ७ हा नवा प्रकार आढळून आला आहे. या प्रकाराचा महाराष्ट्रात एकही रुग्ण आढळून आलेला नाही. नागरिकांनी घाबरुन न जाता दक्षता म्हणून मास्कचा वापर व गर्दीत सुरक्षित अंतर ठेवावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी विधानसभेत केले.