अहिल्यानगर दि. 30 ऑक्टोबर (प्रतिनिधी ) जगताप परिवाराने कायमच आंबेडकरी चळवळीला सहकार्य केले आहे. आंबेडकर स्मारक त्यावेळेचे नगर पालिकेचे नगर अध्यक्ष अरुणकाका जगताप यांनी पूर्णत्वास नेले, जेष्ठ नेते सुनील शिंदे मित्र मंडळाच्या वतीने स्नेह भोजन कार्यक्रमात राष्ट्रवादी सामाजिक विभागाचे जिल्हा जिल्हा अध्यक्ष सुरेशभाऊ बनसोडे बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस बौध्द वदंना घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आभिवादन केले.
यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले आमदार संग्राम जगताप यांनी विकास कामे करत नगर शहर प्रगतीवर आणले आहे. फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीस बरोबर घेऊन विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम पूर्ण केले. शहरात अनेक ठिकाणी समाज मंदिरे बांधून दिले आहेत. त्यामुळे यावेळी आमदार संग्राम जगताप यांना बहुमताने निवडून द्यावे.असे आवाहन त्यांनी केले. यावेळी जेष्ठ मार्गदर्शक भीमराव पगारे, जेष्ठ नेते विजय वडागळे, वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते सुनील शिंदे,पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सुमेध गायकवाड, नितीन कसबेकर सुजित घनगळे,राजेंद्र साळवे, विकास रणदिवे, राउफ कुरेशी, रमेश भिंगारदिवे, अक्षय गायकवाड, विवेक विधाते, सुनील सकट, राजू गोरे, प्रवीण भिंगारदिवे, गणेश पंडित, अविनाश शेलार,सुनील राऊत, किसन करपे, सुनील भाकरे, रमेश सूर्यनारायण, प्रणव पाडळे, सुमन काळापहाड,संजय ताकवाले, मनोज सयंद्र, निलेश ठोंबरे, शबाना शेख, अनिता वाघ, मीरा सरोदे सारंग पाटेकर, विशाल गायकवाड अनिकेत विधाते, संजय साळवे, संतोष शिरसाठ, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा