पाडळी जि प प्राथ.शाळेत उपसरपंच कचरे यांच्याकडून वह्यांचे वाटप!

पाथर्डी दि.२४ जून (प्रतिनिधी)
पाडळी येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांना पाडळी गावचे उपसरपंच श्री दिलीप अण्णा कचरे यांनी वह्यांचे वाटप केले.यावेळी पाडळी गावचे सरपंच बाजीराव गर्ज,धोंडीराम गर्जे,धर्मनाथ कचरे, बाबासाहेब गर्जे,हरिदास कांबळे, भिवाजी भोर्डे ,रमेश कचरे ,प्रकाश कचरे साहेबराव बेळगे शाळेच्या मुख्याध्यापिका मुने मॅडम, वाघमारे मॅडम,थोरात सर,निमसे सर व आदी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते दोन वर्षापासून शाळा कॉलेज बंद होते यावर्षी शाळा कॉलेज सुरळीतपणे चालू झाले सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसत होती.दिलीप कचरे यांनी या सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटप केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी व शाळेने श्री दिलीप अण्णा कचरे यांचे कौतुक केले..
“विद्यार्थी तर सर्वच असतात परंतु पालकत्व काय असतं हे पालक झाल्यावरच कळतं ज्यांना शिक्षणाची आवड आहे त्यांना काही अडचण असेल तर मी स्वतः सर्व विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या अडचणींचे निरसन करील” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.. असे आदर्शवत पाडळी गावचे भूषण उपसरपंच श्री दिलीप अण्णा कचरे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.