बेकायदेशीर विदेशी दारू विकणाऱ्याला भिंगार पोलिसांनी घेतले ताब्यात!

अहमदनगर( प्रतिनिधी) भिंगार पोलीस ठाण्याच्या हद्दीत
-छावनी कॉम्प्लेक्स स्टेटबँक चौक येथे बेकायदेशीर विदेशी दारूची विक्री करणा-याला भिंगार कॅम्प पोलीसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती भिंगार कॅम्प पोलिसांकडून मिळाली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की,शुक्रवार दि.04/11/2022 रोजी रात्री 8/00 वा. सुमारास भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सपोनी श्री.शिशिरकुमार देशमुख यांना गुप्तबातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि,स्टेटबँक चौक येथे छावनी कॉम्प्लेक्स चे बेसमेंटला हॉटेल सारथी चे भिंतीचे आडोशाला एक इसम हा विदेशी दारूची चोरून विक्री करीत आहे आत्ता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीलायक बातमी माळाल्याने सपोनी/शिशिरकुमार देशमुख यांनी लागलीच पोस्टेचे पोना/2178 राहुल राजेंद्र द्वारके,पोना/1764 सचिन नवनाथ धोंडे, पोना/1407 भानूदास गौतम खेडकर अशांना सदर ठिकाणी छापा टाकून कारवाई करा असा आदेश दिल्याने वरील अंमलदार यांनी बातमीतील नमूद ठिकाणी छापा टाकून परशुराम गोविंद राणा (वय 32 वर्षे रा.जुनी वंसत टॉकीज चौक जवळ,माळीवाडा) यास ताब्यात घेऊन त्याचे कब्जातून 8,860/- रू किच्या विवीध कंपनीच्या बिअर व विदेशी कंपनीची दारू जप्त करून त्याचे विरूद्ध भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला पोना/2178 राहुल राजेंद्र द्वारके यांनी फिर्याद दिली आहे.सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अनिल कातकडे सपोनी/शिशिरकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचा अंमलदार यांनी केली आहे.अधिक तपास पोना/1407 भानूदास गौतम खेडकर हे करत आहेत.