शिवसेना शहर उपप्रमुख उजागरेंचा माजी मंत्री आ.थोरातांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश

अहमदनगर दि. 24 ऑक्टोबर (प्रतिनिधी) : शिवसेनेचे शहर उपप्रमुख चंद्रकांत उजागरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला जय महाराष्ट्र करत माजी महसूल मंत्री, काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. धर्मनिरपेक्ष विचार, संविधान वाचवायचे असेल तर काँग्रेस शिवाय आज पर्याय नाही. अल्पसंख्यांक ख्रिश्चन, मुस्लिम समाजाला न्याय देण्याची प्रामाणिक भूमिका केवळ काँग्रेसमध्येच आहे. म्हणूनच मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याचे प्रतिपादन यावेळी बोलताना उजागरे यांनी केले.
आ. थोरात नगर येथे आले असता शासकीय विश्रामगृहावर हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी उजागरें समवेत सत्यशील शिंदे, ललित कांबळे, प्रशांत थोरात, अन्वर शेख, सचिन शिंदे यांच्यासह अनेकांनी प्रवेश केला. प्रवेशापूर्वी उजागरे यांनी आपल्या शिवसेनेच्या पदाचा राजीनामा दिला आहे. काळे यांच्या नेतृत्वाखाली शहराचा सर्वांगीण विकास, समाजाच्या प्रश्नांची सोडवणुक तसेच शहरातील गुंडगिरी, दहशतीचा बिमोड करणे, अल्पसंख्यांक ख्रिश्चन, मुस्लिम समाजाला काँग्रेस समवेत मोठ्या प्रमाणात जोडण्याचे काम करणार असल्याचे यावेळी उजागरे म्हणाले.
उजागरे हे अहमदनगर पहिली मंडळी काँग्री डी १८ ह्युम मेमोरियल चर्चचे ते विश्वस्त आहेत. तसेच अहमदनगरच्या युनायटेड चर्च बोर्ड फॉर वर्ल्ड मिनिस्ट्रीचे ते चेअरमन ही आहेत. त्यांचा ख्रिश्चन समाजासह सर्वच समाज बांधवांशी दांडगा संपर्क आहे. प्रभाग ११ मध्ये त्यांनी गत मनपा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करत मोठ्या संख्येने मते घेतली होती.
आदिवासी समाजाच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी काम करणाऱ्या अक्षय भोसले यांनी देखील आपल्या सहकाऱ्यांसमवेत यावेळी प्रवेश करत काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. जावेद भोसले, अजय भोसले, निलेश भोसले, मयूर चव्हाण, दिनेश भोसले, वैभव भोसले आदींसह युवकांनी मोठया संख्येने यावेळी थोरात यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नगर शहरासह जिल्ह्यातील एसटी प्रवर्गात मोडणाऱ्या समाज बांधवांचे प्रश्न सोडवण्याचे काम आगामी काळात करणार असल्याचे प्रवेशानंतर बोलताना अक्षय भोसले यांनी सांगितले.
यावेळी मनोज गुंदेचा, दशरथ शिंदे, संजय झिंजे, अनिस चूडीवाला, रेव्ह. अनिल नेटके, प्रताप शेळके पाटील, संपतराव म्हस्के, मंगल भुजबळ, उत्कर्षा रूपवते, विलास उबाळे, अभिनय गायकवाड, इंजि. सुजित क्षेत्रे, सुनील क्षेत्रे, उषाताई भगत राणीताई पंडित, सुनिता भाकरे, जरीना पठाण, सुनील भिंगारदिवे, आकाश अल्हाट, विकास भिंगारदिवे, आनंद जवंजाळ, रोहिदास भालेराव, निजाम जहागीरदार, गणेश आपरे, फैयाज शेख, मयूर भिंगारदिवे, किशोर कोतकर, जयराम आखाडे, विनोद दिवटे, अरुण मस्के, जयंत वाघ, ॲड. माणिक मोरे, शरद गुंजाळ, सोफियान रंगरेज, गौरव घोरपडे, विश्वनाथ निर्वाण, अजित वाडेकर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.