बहुजन रयत परिषदेच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या 102 व्या जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थी उत्कृष्ट कलावंत व समाजभूषण गौरव 30 ऑगस्ट रोजी सोहळा! माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे करणार मार्गदर्शन!

अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन रयत परिषदेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त दिनांक 30 ऑगस्ट रोजी श्रमिक कार्यालय टिळक रोड या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केलेले असून सदर कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी कलावंत व समाज भूषण गौरव सोहळा आयोजित केलेला आहे सदर कार्यक्रमात माध्यमिक उच्च माध्यमिक व पदवीपर्यंत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान तसेच उत्कृष्ट कलावंत आणि सामाजिक योगदान देणाऱ्या व्यक्तीचा समाज भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे सदर पुरस्कार ट्रॉफी प्रशस्तीपत्र असे स्वरूप असून बहुजन रयत परिषदेचे प्रदेशाध्यक्ष माननीय रमेश तात्या गालफाडे तसेच महिला प्रदेशाध्यक्ष ॲड. सौ कोमल ताई साळुंखे ढोबळे यांचे शुभ हस्ते देणार असून कार्यक्रमास मार्गदर्शक संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे हे मार्गदर्शन करणार आहेत. सदर कार्यक्रमात प्रदेश उपाध्यक्ष प्रा. ना म साठे ,माननीय सुरेश पाटू तसेच सूर्यकांत भालेराव नाशिक विभागीय अध्यक्ष रवींद्र वाकळे उपस्थित राहणार आहेत. तरी सदर कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गायकवाड जिल्हा सरचिटणीस संतोष साळवे उपाध्यक्ष सत्यवान नवगिरे,सामजिक कार्यकर्ते अशोकभाऊ पवार,संजूभाऊ ताकवाले,डी.जी.कोतकर इत्यादी पदाधिकाऱ्यांनी केलेले असून गुणवंत विद्यार्थी व कलावंत यांनी आपले नाव नोंदणीसाठी जिल्हा सरचिटणीस संतोष साळवे यांच्याशी 7620197251 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन युवा जिल्हाध्यक्ष भगवान मिसाळ व संपर्कप्रमुख इंजिनीयर विलास सूर्यवंशी यांनी केले आहे.