नगर शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा ही शहरातील,जिह्यातील,महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची इच्छा यामध्ये राजकारण करू नये:अशोक गायकवाड महापरिनिर्वान दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब पूर्णाकृती पुतळा समितीचे महामानवाला अभिवादन!

अहमदनगर दि.६ डिसेंबर (प्रतिनिधी ) नगर शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा ही शहरातील,जिह्यातील,महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची इच्छा यामध्ये कोणत्याही पक्षाने राजकारण न आणता एका विचाराने काम करावे .
असे प्रतिपादन डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती समितीचे जेष्ठ मार्गदर्शक अशोक गायकवाड यांनी केले.विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील मार्केटयार्ड या ठिकाणी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती समितीच्या वतीने आभिवादन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी पूर्णाकृती पुतळा समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बोलताना ते म्हणाले पर्णाकृती समिती एका विचाराने कार्यरत आहे.परंतु काही लोकांच्या एक वेगळा विचार येत आहे.त्यांनी या समिती बरोबर राहून काम करावे.असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.अहमदनगर महानगर पालिकेच्या इतिहासात कदाचित ही पहिलीच घटना असेल की कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे हॉटेल सुखसागरचे अतिक्रमण काढण्यात आली. ही जागा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी मोकळी करण्यात आली.पुतळा समितीच्या आधीन राहून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभा करण्याचा कार्यकर्त्यांचा मानस असल्याचे त्यांनी व्यक्त केले.