अहमदनगर दि. 27 एप्रिल (प्रतिनिधी) पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे ) गट महायुती यांच्यातील मित्रपक्ष आहे.
अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या कोहिनुर मंगल कार्यालय येथील संपर्क कार्यालयात महायुती व, पीपल्स रिपब्लिकन पार्टीची बैठक “प्रा.जोगेंद्र कवाडे सर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, सुजयदादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ” च्या जय घोषात संपन्न झाली. याबैठकीचे अध्यक्ष भाजपचे शहर जिल्हाअध्यक्ष ऍड. अभय आगरकर होते. यावेळी माजी महापौरबाबासाहेब वाकळे, माजी नगरसेवक धनंजय जाधव हे उपस्थित होते.
यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सुमेध गायकवाड, जिल्हा सपंर्क प्रमुख नितीन कसबेकर, जिल्हासचिव महेश भोसले आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी बैठकिचे अध्यक्ष ऍड. अभय आगरकर यांनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन काम केले जाईल असे आश्वासन दिले.
सदर बैठकीस जेष्ठ नेते प्रा. भीमराव पगारे, जेष्ठ नेते सुरेश भिंगारदिवे, सारंग पटेकर,महिला जिल्हा अध्यक्षा गौतमी भिंगारदिवे,नंदा जगताप, वदंना पातारे, राणी शेलार, ललिता पाटोळे, अनिता धुराळे, पूनम जोशी, अनिता शिंदे, महेमुदा पठाण, सोनल बिगे, जिल्हा कार्याध्यक्ष नितीन साळवे, जिल्हा उपाध्यक्ष विशाल गायकवाड, शहरअध्यक्ष संजय साळवे, शहर जिल्हा अध्यक्ष किरण जाधव, कर्जत तालुका अध्यक्ष महेंद साळवे, शरद शिंदे, युवक तालुका अध्यक्ष कमलेश साळवे, पाथर्डी तालुका अध्यक्ष विलास गजभिव, शहर अध्यक्ष पवन फिरोदिया, राहुरी तालुका अध्यक्ष अनिल पलघडमल, शेवगाव तालुका अध्यक्ष संजय उनवणे, शहर अध्यक्ष बाळासाहेब मेहेत्रे,किरण गायकवाड, सिद्धांत गायकवाड, संघराज गायकवाड, गणेश गायकवाड, शांतवन साळवे, संदेश क्षेत्रे आदी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा