राजकिय

देशातील तरुणांच्या रोजगारासाठी कोणताही ठोस कार्यक्रम अर्थसंकल्पावरील बजेटमध्ये नाही: किरण काळे

अहमदनगर दि. २ फेब्रुवारी (प्रतिनिधी)
देशातील तरुणांच्या रोजगारासाठी कोणताही ठोस कार्यक्रम बजेटमध्ये नाही. सात लाखांपर्यंतचे उत्पन्न जरी करमुक्त करण्यात आले असले तरी सर्वसामान्यांच्या उत्पन्न वाढीसाठी कोणताही कार्यक्रम दिसत नाही. पेट्रोल, डिझेल, गॅसचे वाढलेले दर, यामुळे वाढलेली महागाई, याला दिलासा देणारी कोणतीही पाऊले उचलण्यात आलेली नाहीत. लघु आणि मध्यम उद्योगांना पतपुरवठ्याची तरतूद काही अंशी दिसत असली तरी प्रत्यक्षात ती होण्याची हमी यात दिसत नाही. वरकरणी हा अर्थसंकल्प १३० कोटी जनतेसाठीचा म्हणून मांडला गेला असला तरी यातील बहुतांशी धोरणं ही मूठभर उद्योगपतींच्या लाभासाठीचा राजमार्ग ठरणारी आहेत. यामुळे यातून सामान्य माणूस, गोरगरीब, छोटे उद्योजक, व्यापारी, नोकरदार, शेतकरी, कष्टकरी मात्र हवालदिल राहिला आहे. एकूणच आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ज्याप्रमाणे यापूर्वी प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करू या जुन्या चुनावी जुमल्याची पुनर्प्रचिती यावी अशी खोटी स्वप्ने देशातील जनतेला या सरकारने दाखवली आहेत. हा अर्थसंकल्प आजवरचा सर्वात आकर्षक दिसणारा मात्र प्रत्यक्षात अत्यंत कोरडा असणारा सर्वात निराशाजनक अर्थसंकल्प आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे