गुन्हेगारी

संगमनेर,रायतेवाडी येथे १४ लाख २८ हजार रूपयांचा मद्यसाठा जप्त दुय्यम निरीक्षक उत्पादन शुल्क विभागाची कार्यवाही

अहमदनगर.दिनांक 16 (प्रतिनिधी) स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर गुप्त बातमीदारकडून मिळालेल्या माहितीनुसार दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क संगमनेर-१ यांनी त्यांचे पथकासह,चैतन्य सुभाष मंडलिक यांच्या राहते घरी रायतेवाडी ता. संगमनेर जि.अहमदनगर येथे दारुबंदी गुन्हयांकामी छापा मारला.
या छाप्यामध्ये गोवा राज्य दमण व दिव राज्य निर्मितीचा व बनावट विदेशी मद्याचा साठा मिळून आलेला आहे. हुंदाई व्हेन्यू कंपनीची पांढ-या रंगाची एक चारचाकी वाहन क्र.एम.एच.१७ सी. एम. ४२६८, आरोपीकडून जप्त करण्यात आलेले तीन मोबाईल इत्यादी साठा जप्त करण्यात आलेला आहे.

या गुन्हयाची अधिकची माहिती घेतली असता प्रथम दर्शनी दिसून येते की, महाराष्ट्र राज्यात निर्मित व विक्रीसाठी असलेल्या मद्याच्या रिकाम्या बाटल्या व बनावट बुचे वापरुन त्यामध्ये परराज्यातील मद्य भरुन ते महाराष्ट्र राज्यातील मद्य असल्याचे भासवून मद्यविक्री करुन शासनाचा मुहसुल बुडविण्याचा आरोपीचा हेतू असल्याचे दिसून येते.

या नमुद गुन्हयांत एकूण १४ लाख 28 हजार ९५० रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे. बेकायदेशीरपणे परराज्यातील विदेशी मद्याचा साठा तसेच बनावट मद्य निर्मिती करीत असल्याने या गुन्हयांत चैतन्य सुभाष मंडलिक व सुरेश मनोज कालडा, या दोन आरोपीस अटक करण्यांत आलेली असून त्यांचे विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यांत आलेला आहे. यामध्ये अजूनही काही लोकांचा समावेश असण्याची शक्यता असून या गुन्हयांचा पुढील तपास सुरु आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास श्री. एम.डी. कोडे. दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, संगमनेर- १. जि. अहमदनगर हे करीत आहेत.
या कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे श्री. कांतीलाल उमाप, मा. आयुक्त सो. मुंबई श्री. सुनिल चव्हाण, मा. संचालक (अंबलबजावणी व दक्षता) मुंबई, श्री. अनिल चासकर, विभागीय उप आयुक्त पुणे विभाग पुणे व श्री. गणेश द. पाटील, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यांत आली आहे.
या कारवाईत श्री. एन. बी. शेंडे, उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, मे.क. शंकररराव काळे स. सा. का. कोपरगांव, श्री. आर. डी. वाजे. निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, संगमनेर अहमदनगर श्री. अनिल पाटील, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, मे. टिळकनगर इंद्र. श्रीरामपूर, श्री. जी. आर. चांदेकर, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, भप.क्र.२. श्रीरामपूर श्री. व्हि.जी.सुर्यवंशी दुय्यम निरीक्षक संगमनेर-२. श्री. एस. आर. वाघ, सहा. दुय्यम निरीक्षक, संगमनेर, श्री. सचिन गुंजाळ, जवान. बी. ई. मोर, सहा. दुय्यम निरीक्षक, कोपरगांव श्री. सचिन बटुळे, जवान, कोपरगाव श्रीमती. एस. आर. वराट, म जवान, श्री. तुळशीराम करंजुले, सहा. दुय्यम निरीक्षक व श्री. निहाल शेख, वाहन चालक हे सदर कारवाईत सहभागी होते. असे राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक गणेश पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे